अहमदनगर : काजू बर्फी आपल्याकडे जास्त लोकप्रिय आहे. सण उत्सवाच्या काळात काजू बर्फी हमखास दिसते. काजू बर्फीला काजू कटली असेही म्हणतात. ही बर्फी तुम्ही घरीही सहज बनवू शकता. काजू बर्फी बनवण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करण्याची गरज नाही. हे बनवण्यासाठी तुम्हाला फक्त काजू, दूध आणि साखर लागेल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात वेलची पावडरही टाकू शकता. त्यावर सिल्व्हर वर्क करुन सर्व्ह करू शकता. आज आम्ही तुम्हाला काजू बर्फी कशी तयार करायची, याची रेसिपी सांगणार आहोत. रेसिपी सुद्धा खूप सोपी आहे. या रेसिपीच्या मदतीने तुम्ही अगदी काही वेळातच बर्फी तयार करू शकता.
साहित्य – 250 ग्रॅम काजू, 250 ग्रॅम साखर, 240 ग्रॅम दूध, सिल्व्हर वर्क, तूप लावलेले भांडे.
रेसिपी
सर्वप्रथम काजू आणि दूध एकत्र करून पेस्ट तयार करा. पेस्टमध्ये साखर टाका. मंद आचेवर शिजू द्या. साखर विरघळल्यावर मिश्रण एकदा उकळून घ्या. मिश्रण मध्यम आचेवर ढवळत राहा. मिश्रण भांड्याच्या बाजू सोडून कणकेसारखे झाल्यावर गॅस बंद करा. तूप लावलेल्या भांड्यामध्ये काढून घ्या. त्यानंतर सुमारे 1/4 आणि 1/8 जाड तुकड्यांमध्ये सेट करण्यासाठी ठेवा. त्यावरुन सिल्व्हर वर्क लाऊन घ्या. थंड होण्यासाठी बाजूला ठेऊन द्या. त्यानंतर डायमंड आकारात कट करुन घ्या. अशा पद्धतीने अगदी काही वेळात तुम्हा काजू बर्फी तयार करू शकता.