Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Todays Recipe : तेल न टाकता तयार करा टेस्टी राजमा; जाणून घ्या, एकदम सोपी रेसिपी

अहमदनगर : आजच्या धावपळीच्या जमान्यात जवळपास प्रत्येकाचे आहाराकडे दुर्लक्ष होते. आहाराच्या वेळा पाळल्या जात नाहीत. फास्टफूडचे प्रमाण वाढले आहे. जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाण्याचेही प्रमाण जास्त आहे. अशा प्रकारच्या आहारामुळे आरोग्याच्याही अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे सध्याच्या काळात आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर आहार सुद्धा पौष्टिक असणे गरजेचे आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशाच पद्धतीने तेलाचा वापर न करता तयार होणाऱ्या एका टेस्टी खाद्यपदार्थाची रेसिपी सांगणार आहोत. इथे आम्ही तुम्हाला तेलाशिवाय बनवलेल्या राजमाची रेसिपी (Zero Oil Rajma Recipe) बनवायला शिकवणार आहोत.

Advertisement

साहित्य- 2 कप राजमा, बारीक केलेला कांदा 1, बारीक केलेला लसूण 6-7 पाकळ्या, बारीक केलेले अद्रक, तमालपत्र 1, दालचिनी, लवंग – 3-4, वेलची 2, काश्मिरी लाल मिरची पावडर 1 छोटा चमचा, गरम मसाला पावडर 1 चमचा, धने पावडर 1 चमचा, काळी मिरी पावडर अर्धा चमचा, टोमॅटो प्युरी 1/4 कप, चवीनुसार मीठ.

Loading...
Advertisement

रेसिपी
राजमा 6-8 तास भिजत ठेवा. भिजलेले राजमा पाण्यातून काढून प्रेशर कुकरमध्ये टाका. नंतर त्यात 4 वाट्या पाणी, मसाले, बारीक केलेला कांदा, अद्रक, लसूण, चवीनुसार मीठ टाकून कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या करून राजमा चांगले शिजून घ्या. नीट शिजल्यावर कढईत टाका आणि मग त्यात टोमॅटो प्युरी, बारीक केलेले मसाले टाकून चांगले मिक्स करा. राजमा चांगले शिजेपर्यंत किंवा 15-18 मिनिटे शिजू द्या. तेल न टाकता टेस्टी राजमा तयार आहे, रोटी बरोबर सर्व्ह करा.

Advertisement

Recipe : दुपारच्या जेवणासाठी बनवा रेस्टॉरंट स्टाईल स्वादिष्ट पंजाबी दाल मखनी

Advertisement
Advertisement

Leave a Reply