Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Todays Recipe : ‘अशा’ पद्धतीने घरीच बनवा टेस्टी बेसन भेंडी.. ही घ्या एकदम सोपी रेसिपी..

अहमदनगर : आपल्याकडे अनेक पद्धतींनी भेंडीची भाजी तयार केली जाते. काही जण कांदा टाकून तर काही जण कांदा न टाकता ही भाजी तयार करतात. तसेच अनेक वेगळ्या रेसिपी आहेत ज्यांच्या मदतीने भेंडी भाजी तयार केली जाते. भरवा भेंडी किंवा भेंडी करी, मसालेदार भेंडी या प्रकारच्या भाज्या आपल्याला माहित आहेत. मात्र, आज आम्ही तुम्हाला येथे वेगळ्या पद्धतीने तयार होणारी खास बेसन भेंडी कशी तयार करायची याची रेसिपी सांगणार आहोत. हे बनवण्यासाठी तुम्हाला खूप कमी साहित्य आवश्यक आहे, तसेच तुम्ही ते अगदी कमी वेळात तयार करू शकता. तुम्ही कुठे बाहेरगावी जात असाल, म्हणजे ट्रेन किंवा बसने प्रवास करत असाल तर ही भाजी बनवून घेऊ शकता. चला, तर मग टेस्टी बेसन भेंडी भाजी कशी तयार करायची हे जाणून घेऊ या..

Advertisement

साहित्य- 250 ग्रॅम भेंडी, एक कांदा, अर्धा चमचा हळद, एक चमचा लाल तिखट, एक लिंबाचा रस, दोन चमचे बेसन आणि थोडे मीठ.

Advertisement

मसाला बनवण्यासाठी: बारीक केलेले दोन छोटे कांदे, थोडे किसलेले अद्रक, बारीक केलेली हिरवी मिरची, अर्धा चमचा जिरे, चिमूटभर हिंग, बारीक केलेले दोन टोमॅटो, अर्धा चमचा हळद, एक चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धी वाटी ताजे दही, अर्धी वाटी पाणी, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर, तेल आवश्यकतेनुसार.

Advertisement

रेसिपी
सर्वप्रथम भिंडी पाण्याने स्वच्छ करा, त्यानंतर कोरडी करा. त्यात पाणी अजिबात नसावे. यानंतर भेंडीच्या दोन्ही बाजूंनी कडा काढून त्याचे दोन भाग करा. त्यात अर्धा चमचा हळद, एक चमचा लाल तिखट, एका लिंबाचा रस, दोन चमचे बेसनपीठ आणि थोडे मीठ टाकून सर्व साहित्य नीट मिसळून घ्या आणि थोडा वेळ बाजूला ठेऊन द्या. त्यानंतर मसाला तयार करा. मसाल्यांसाठी प्रथम नॉनस्टिक पॅनमध्ये तेल टाका. तेल गरम झाल्यावर त्यात जिरे टाका आणि तडतडल्यावर त्यात हिंग आणि अद्रक आणि बारीक केलेली हिरवी मिरची टाका. काही सेकंद परतून मग बारीक केलेला कांदा टाका.

Loading...
Advertisement

कांदा जास्त तळायचा नाही, यानंतर बारीक केलेला टोमॅटो टाका आणि थोडे मीठ टाकून थोडा वेळ झाकण ठेवा. जेणेकरून टोमॅटो चांगले विरघळेल. विरघळल्यानंतर त्यात अर्धा चमचा हळद, एक चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धने पावडर टाकून गॅस मंद करून मसाले आणखी काही वेळ शिजू द्या. आता एक वेगळे पॅन घ्या आणि त्यात थोडे तेल टाका. तेल गरम झाल्यावर त्यात कांद्याचे जाडसर तुकडे टाका आणि हलके तळून घ्या आणि प्लेटमध्ये काढून घ्या. यानंतर या तेलात भेंडी टाकून थोडे तळावे. जास्त तळू नका, थोडीशी शिजल्यावर भेंडी प्लेटमध्ये काढा.

Advertisement

या दरम्यान मसाल्याचा गॅस बंद करून त्यात अर्धी वाटी दही टाकून मसाल्याबरोबर पटकन मिसळून घ्या. मिसळल्यानंतर गॅस चालू करा आणि थोडा वेळ मसाले शिजू द्या. यानंतर त्यात अर्धा कप पाणी टाकून मसाले शिजू द्यावे. नंतर तळलेली भिंडी टाका आणि सर्वकाही मिसळून घ्या. मंद गॅसवर झाकण ठेवून भेंडी 3 ते 4 मिनिटे शिजू द्यावी. शेवटी, त्यात जाड तळलेले कांदे टाका आणि सर्वकाही पुन्हा मिसळा. यानंतर शेवटी गरम मसाला टाका. अशा पद्धतीने टेस्टी बेसन भेंडी तयार होईल. गरमागरम रोटी किंवा पराठ्याबरोबर सर्व्ह करा.

Advertisement

घरीच बनवा मसालेदार भरवा भेंडी.. ही घ्या एकदम खास रेसिपी.. अगदी कमी वेळात होईल तयार..

Advertisement
Advertisement

Leave a Reply