Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

घरीच बनवा मसालेदार भरवा भेंडी.. ही घ्या एकदम खास रेसिपी.. अगदी कमी वेळात होईल तयार..

अहमदनगर : आपल्याकडे अनेक पद्धतींनी भेंडीची भाजी तयार केली जाते. काही जण कांदा टाकून तर काही जण कांदा न टाकता ही भाजी तयार करतात. तसेच अनेक वेगळ्या रेसिपी आहेत ज्यांच्या मदतीने भेंडी भाजी तयार केली जाते. भरवा भेंडी किंवा भेंडी करी या प्रकारच्या भाज्या आपल्याला माहित आहेत. तसेच मसालेदार भेंडीची भाजी सुद्धा माहित आहेच. मात्र, आज आम्ही तुम्हाला येथे मसालेदार भरलेली भेंडी वेगळ्या पद्धतीने कशी तयार करायची, याची खास रेसिपी सांगणार आहोत. हे बनवण्यासाठी तुम्हाला खूप कमी साहित्य आवश्यक आहे, तसेच तुम्ही ते अगदी कमी वेळात तयार करू शकता. तुम्ही कुठे बाहेरगावी जात असाल, म्हणजे ट्रेन किंवा बसने प्रवास करत असाल तर ही भाजी बनवून घेऊ शकता. चला, तर मग मसालेदार भेंडी भाजी कशी तयार करायची हे जाणून घेऊ या..

Advertisement

साहित्य-भेंडी, मीठ, तिखट, धने पावडर, हळद, दही आणि तेल आवश्यकतेनुसार.

Advertisement

रेसिपी
मसालेदार भेंडी भाजी तयार करण्यासाठी सर्वात आधी भेंडी पाण्याने स्वच्छ करुन घ्या. काही वेळ कोरडे होण्यासाठी बाजूला ठेऊन द्या. आता एका भांड्यात सर्व मसाले चवीनुसार मिसळा आणि त्यात थोडे पाणी टाका. पाणी मिसळून पेस्ट बनवा. आता भेंडी एका हाताने हलकी उघडून त्यात मसाल्याची पेस्ट भरा.

Loading...
Advertisement

सर्व भेंडी अशाच पद्धतीने मसाल्याने भरुन घ्या. आता कढईत तेल गरम करा आणि नंतर सर्व भेंडी गरम तेलात टाका आणि नीट तळून घ्या. झाकण न ठेवता मंद आचेवर शिजू द्या. 12 ते 15 मिनिटांत भेंडी शिजली जाईल. जर मसाला भांड्यात शिल्लक राहिली असेल तर ते देखील त्यात टाका आणि चांगले मिसळा. अशा पद्धतीने टेस्टी मसालेदार भरलेली भेंडी तयार आहे. रोटी, पराठा किंवा पोळीबरोबर सर्व्ह करा.

Advertisement

चटपटीत, मसालेदार खायचेय का? तर ही घ्या भेंडी करीची रेसिपी.. बनवा घरच्या घरी

Advertisement
Advertisement

Leave a Reply