Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Todays Recipe : ‘अशा’ पद्धतीने घरीच बनवा टेस्टी डाळ; ‘या’ आहेत दोन सोप्या रेसिपी..

अहमदनगर : डाळ हा देशातील लोकांच्या आहारातील एक मुख्य खाद्यपदार्थ आहे. डाळ अतिशय चवदार तसेच आरोग्यदायी आहे. तुम्हाला वजनात वाढ करायची आहे किंवा वजव कमी करायचे आहे, दोन्ही बाबतीत डाळ तुमच्या आहाराचा एक भाग आहे. आपल्याकडे लोक सर्वाधिक तूर डाळ खातात. डाळ विविध प्रकारांनी तयार केली जाते. आपल्याकडे डाळीला फोडणी देण्याच्या पद्धतीही वेगळ्या आहेत. येथे आम्ही तुम्हाला दोन पद्धती सांगणार आहोत. या अतिशय सोप्या रेसिपी आहेत ज्याद्वारे तुम्ही डाळ आधिक स्वादिष्ट बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊ या, काय आहेत या रेसिपी..

Advertisement

रेसिपी 1
कांदा-लसूण न टाकता डाळ बनवायची असेल तर अशा प्रकारे बनवू शकता. डाळ बनवण्याआधी भिजून घेणे सर्वात महत्वाचे आहे. तुम्ही डाळ किमान अर्धा तास भिजत ठेवा. त्यानंतर ते चांगले पाण्याने स्वच्छ करा. आता कुकरमध्ये डाळ टाका. त्यात हळद, मीठ आणि पाणी टाका. तसेच बारीक केलेले अद्रक आणि टोमॅटो टाका. डाळ उकळून घ्या. डाळ खूप पातळ नसावी, पाणी वेगळे होऊन डाळ वेगळी राहील असे सुद्धा नको. डाळ शिजल्यावर चमच्याने थोडी मॅश करा. आता कढईत तूप घ्या. तूप गरम झाल्यावर त्यात हिंग टाका. त्यानंतर जिरे टाका. आता हिरवी मिरची बारीक केल्यानंतर त्यात थोडी कसुरी मेथी टाका. आता त्यात डाळ टाका. डाळ थोडावेळ गॅसवर ठेवा. गॅस बंद केल्यावर त्यात लिंबाचे चार थेंब पिळून कोथिंबीर टाका.

Loading...
Advertisement

रेसिपी 2
टोमॅटो आणि अद्रक टाकून डाळ कुकरमध्ये उकळून घ्या. डाळ उकळल्यानंतर कढईत तूप गरम करा. त्यात हिंग, जिरे आणि बारीक केलेला कांदा टाका. यानंतर थोडी कसुरी मेथी टाका. कांदा गुलाबी होईपर्यंत परता आणि त्यात डाळ टाका. थोड्या वेळाने गॅस बंद करा. आता एका चमच्यात तूप गरम करा. त्यात लाल मिरचीचे तुकडे टाकून थोडा लसूण टाका. त्यानंतर ही फोडणी डाळीत टाका. या पद्धतीने तुम्ही डाळ आधिक स्वादिष्ट तयार करू शकता. रोटी किंवा भाताबरोबर सर्व्ह करा.

Advertisement

घरीच तयार करा ढाबा स्टाइल डाळ तडका; माहिती करुन घ्या काय आहे रेसिपी..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply