Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. अवघडच झाले की.. अहमदनगरमध्ये खैदान जोरदार; शेतकऱ्यांच्या काळजाचा ठेका चुकला

अहमदनगर : सध्या मागील दोन दिवसापासून महाराष्ट्रात अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होत आहे. नाशिक आणि अनेक जिल्ह्यात यामुळे फलोत्पादक शेतकरी आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा झटका बसला आहे. याच संकटाचे लोन येण्याची शक्यता असल्याचे वातावरण असल्याने आता नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या काळजाचा ठेका चुकला आहे. कारण, शुक्रवारी संध्याकाळी रात्री ९ वाजता नगर शहर, तालुका आणि जिल्ह्याच्या अनेक भागात खैदान (जोराचा वादळी वारा) सुरू झाला आहे.

Advertisement

एकीकडे केंद्रातील बजेट आणि आज सादर झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे. विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना नियमाचे खलिते दाखवत चुना लावला आहे. त्याच्या विरोधात सोशल मीडियामध्ये वातावरण तप्त असतानाच वीज तोडण्याचा झपाटा महावितरण या सरकारी कंपनीने लावला आहे. खरिपाच्या अंतिम टप्प्यातील पिकांना आणि भाजीपाला व फळ उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका सहन करावा लागला आहे. अशावेळी आता अवकाळी पावसाचे मोठे संकट आलेले आहे. परिणामी शेतकरी हवालदिल झाला आहे.

Loading...
Advertisement

जिल्ह्यात अवकाळी पाऊस काही ठिकाणी झाल्यास शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान होणार आहे. एकूण बिघडलेले वातावरण लक्षात घेता आता अवकाळी होणार आणि हे अस्मानी संकट सुलतानी संकटाप्रमाणे वैताग देणार अशीच स्थिती आहे. यातून मार्ग कसा काढायचा याचा पेच आता ग्रामीण भागासमोर आहे. कारण, शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा झटका बसल्यास शेत्माजून आणि ग्रामीण व्यावसायिक यांनाही याचा थेट परिणाम सहन करावा लागणार आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply