Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

वेगळे काहीतरी : फक्त 15 मिनिटांत तयार होतील ब्रेड पोहे.. जाणून घ्या, सोपी रेसिपी..

अहमदनगर : अनेकांना सकाळी नाश्ता करायला वेळ मिळत नाही. गडबड असेल तर नाश्ता करायचे राहून जाते. त्यामुळे सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेत अगदी कमी वेळात तयार होणारे पदार्थ तयार केले जातात. आपल्याकडे पोहे जास्त पसंत केले जातात. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात बहुतेक घरात पोहे असतात. पोह्याप्रमाणेच कमी वेळात तयार होणारे आणखीही काही पदार्थ आहेत.

Advertisement

हे पदार्थ कमी वेळेत तयार होतात आणि तितकेच स्वादिष्टही ठरतात. तसेच रोजच्या नाश्त्यातही वेगळेपण मिळते. तर आज आम्ही अशाच एका अगदी वेगळ्या खाद्य पदार्थाची रेसिपी तुम्हाला सांगणार आहोत. ब्रेड पोहा हा सकाळच्या नाश्त्यासाठी एक वेगळा पर्याय ठरू शकतो. ब्रेड पोहे खूप लवकर बनतात. यामध्ये भाज्यांचे प्रमाण वाढ करता येते. जाणून घ्या, ब्रेड पोहे कसे बनवायचे (Bread poha recipe).

Advertisement

साहित्य – 7 ते 8 ब्रेडचे तुकडे, 1 बारीक केलेला कांदा, अर्धा चमचा हळद पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा मोहरी, चिमूटभर हिंग, चवीनुसार मीठ, 2 चमचे लिंबाचा रस, 2 चमचे देशी तूप किंवा बटर.

Advertisement

रेसिपी
ब्रेड पोहे बनवण्यासाठी प्रथम कढई गरम करण्यासाठी ठेवा आणि यामध्ये देशी तूप किंवा बटर टाका. आता त्यात हिंग आणि मोहरी टाका. मोहरी तडतडल्यावर त्यात बारीक केलेला कांदा टाकून तळून घ्या. आता त्यात ब्रेडचे छोटे तुकडे टाका. हवे असल्यास त्यात पोहे सुद्धा टाकू शकता. त्यात हळद आणि लाल तिखट टाकून शिजू द्या. सर्व्ह करण्यापूर्वी, लिंबाचा रस टाका आणि चांगले मिसळून घ्या.

Loading...
Advertisement

तुम्हाला हवे असल्यास त्यात बारीक केलेली सिमला मिरची, टोमॅटो, भाजलेले शेंगदाणे आणि वाटाणे देखील टाकू शकता. तुम्हाल वाटले तर त्यात थोडे दहीही टाकता येईल. किंवा बारीक केलेली कोथिंबीर सुद्धा टाकू शकता. नाश्त्यात चहा, कॉफी बरोबर ब्रेड पोहे सर्व्ह करा.

Advertisement

नाश्त्यात पोहे तयार करण्यासाठी सर्वात सोपी रेसिपी; पोहे होतील आधिक टेस्टी अन् हेल्दी..

Advertisement

नव्या वर्षात नाश्त्यासाठी तयार करा स्पेशल इंदोरी पोहे.. ही आहे अगदी सोपी रेसिपी..

Advertisement
Advertisement

Leave a Reply