Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Recipe : आता घरीच अशा पद्धतीने तयार करा टेस्टी अन् हेल्दी सांबार; ही आहे सोपी रेसिपी..

अहमदनगर : दक्षिण भारतीय खाद्य पदार्थ विशेष लोकप्रिय आहेत. आता हे खाद्य पदार्थ फक्त दक्षिण भारतात नाही तर जगभरात तयार केले जातात. त्यातही बहुतेक खाद्य पदार्थ हे स्वादिष्ट सांबारशिवाय अपूर्ण आहेत. इडली असो, डोसा असो, उत्तपम असो किंवा इतर कुठलाही दक्षिण भारतीय पदार्थ असो, सांबारमुळे हे पदार्थ आधिक स्वादिष्ट ठरतात. आरोग्याच्या दृष्टीनेही सांबार खूप फायदेशीर आहे. तुम्हालाही जर दक्षिण भारतीय खाद्य पदार्थ पसंत असतील आणि जर तुम्हाला अगदी साऊथ इंडियन स्टाईल सांबार घरीच तयार करायचे असेल तर आज आम्ही एक सोपी रेसिपी सांगणार आहोत. या रेसिपीद्वारे तुम्ही खास साऊथ इंडियन स्टाईल सांबार बनवू शकता.

Advertisement

साहित्य- तूर डाळ 1 वाटी, बारीक केलेला टोमॅटो 1, बारीक केलेला कांदा 1, शेवग्याच्या शेंगा 3, कढीपत्ता, चिंच 1/4 कप, गुळ 1 तुकडा, हळद 1/4 चमचा, मोहरी 1 चमचा, हिंग चिमूटभर, सांबार मसाला 3 चमचे, सुक्या लाल मिरच्या 2-3, तेल 1 चमचा, मीठ चवीनुसार.

Advertisement

रेसिपी
दक्षिण भारतीय पद्धतीचा सांभार बनवण्यासाठी प्रथम चिंच घ्या आणि एका भांड्यात पाण्यात टाका आणि 20-25 मिनिटे ठेवा. त्यानंतर ते गाळून बाजूला ठेवा. आता तूर डाळ घेऊन पाण्याने स्वच्छ करुन घ्या. यानंतर टोमॅटो, कांदे, शेवग्याच्या शेंगा घ्या. आता प्रेशर कुकर मंद आचेवर ठेवा आणि त्यात 2 कप पाणी टाका आणि त्यात डाळ, भाज्या आणि चिंच टाका. यानंतर कुकरमध्ये चवीनुसार मीठ व हळद टाकून कुकरचे झाकण बंद करा. कुकरमध्ये ३-४ शिट्या आल्या की गॅस बंद करा. आता एका भांड्यात डाळ काढा.

Loading...
Advertisement

आता कढई गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा. गरम झाल्यानंतर त्यात उकडलेली डाळ टाकून शिजू द्या. त्यात आणखी पाणी टाका. सांबार उकळायला लागल्यावर त्यात गूळ, सांबार मसाला टाकून झाकण ठेवून 10 मिनिटे शिजू द्या. डाळ घट्ट झाल्यावर गॅस बंद करा. आता डाळ थंड करण्यासाठी एका छोट्या भांड्यात एक चमचा तेल टाका आणि त्यात मोहरी टाका. मोहरी तडतडायला लागल्यावर त्यात लाल तिखट, हिंग, कढीपत्ता टाका. तळून घेतल्यानंतर सांबारात फोडणी टाका. त्यानंतर तुमचे स्वादिष्ट सांबार तयार आहे.

Advertisement

टेस्टी अन् हेल्दी नाश्ता हवाय; मग, या 3 साऊथ इंडियन डिश तयार कराच; रेसिपीही आहे अगदी सोपी..

Advertisement
Advertisement

Leave a Reply