अहमदनगर : उपवासाच्या दिवशी आपल्याकडे प्रत्येक घरात साबुदाणा खिचडी हमखास असतेच. त्यात नवीन काही नाही. उपवास म्हटले की साबुदाणा खिचडीचेच नाव समोर येते. त्यानंतर अन्य खाद्य पदार्थांचा विचार डोक्यात येतो. साबुदाणा असा पदार्थ आहे ज्याद्वारे फक्त खिचडीच नाही तर दुसरेही पदार्थ तयार करता येतात. उपवासात साबुदाण्याची खीर केली जाते. तसेच साबुदाणा खिचडीही असते. उपवासाच्या दिवशी तुम्हालाही जर साबुदाणा खिचडी तयार करायची असेल तर आम्ही तुम्हाला एक वेगळी रेसिपी सांगणार आहे. ज्याद्वरे तुम्ही अगदी सहज खिचडी तयार करू शकता. साबुदाणा खिचडीद्वारे शरीराला ऊर्जा मिळते, तसेच बराच वेळ पोट भरलेले वाटते.
साहित्य- साबुदाणा 1 वाटीस शेंगादाणे अर्धा कप, उकडलेले बटाटे 1, बारीक केलेल्या हिरव्या मिरच्या 2-3, जिरे 1 चमचा, मीठ चवीनुसार, लिंबाचा रस 1 चमचा, तूप/तेल 1 चमचा.
रेसिपी
साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी प्रथम साबुदाणा घ्या आणि पाण्याने स्वच्छ करा आणि सुमारे 2 तास पाण्यात भिजू द्या. यानंतर गॅसवर मध्यम आचेवर कढई गरम करण्यासाठी ठेवा. त्यात शेंगदाणे टाकून चांगले परतून घ्या. यानंतर शेंगदाणे बारीक करुन घ्या. आता उकडलेले बटाटे घ्या आणि त्यांचे लहान तुकडे करा आणि एका भांड्यात बाजूला ठेवा. साबुदाणा फुगल्यानंतर एका भांड्यात काढून ठेवावा.
आता कढई घेऊन त्यात तूप/तेल टाकून मंद आचेवर गरम करा. तूप/तेल गरम झाल्यावर गॅस मध्यम करा. त्यामध्ये कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या टाकून तळून घ्या. त्यानंतर त्यात उकडलेले बटाटे टाकून परतून घ्या. साधारण 2 मिनिटे गॅसवर शिजू द्या. आता या मसाल्यात साबुदाणा टाकून चांगले मिक्स करून घ्या आणि साधारण 5 मिनिटे झाकून ठेवा आणि मंद आचेवर शिजू द्या.
ठरलेल्या वेळेनंतर एकदा हे मिश्रण चांगले एकजीव करुन घ्या. यानंतर त्यात बारीक केलेले शेंगदाणे टाका आणि साबुदाणा बरोबर मिसळून घ्या. सुमारे 1 ते 2 मिनिटे शिजू द्या. त्यानंतर गॅस बंद करा. खिचडीमध्ये खडी मीठ आणि लिंबाचा रस टाका आणि पुन्हा चांगले मिसळा. तुमची स्वादिष्ट उपवासाची साबुदाणा खिचडी तयार आहे.
उपवासासाठी हटके रेसिपी : झटपट बनवा कुट्टू पनीर पकोडे..