Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

नाश्त्यासाठी कमी वेळात तयार करा टेस्टी बेसन ब्रेड टोस्ट.. रेसिपीही आहे एकदम सोपी..

अहमदनगर : बेसन ब्रेड टोस्ट हा नाश्ता म्हणून एक लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. जवळपास प्रत्येक घरात सकाळी एक प्रश्न पडतो की नाश्तासाठी काय तयार करायचे. बर्‍याच वेळा असेही होते की नाश्ता बनवायला फारसा वेळ नसतो, पण स्वादिष्ट नाश्ता बनवण्याचे टेन्शन असते. तुम्हालाही कधी अशा परिस्थितीचा सामना करावा लागला तर काळजी करण्यासारखे काही नाही. अशा परिस्थितीत बेसन ब्रेड टोस्ट तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. बेसन ब्रेड टोस्टचे वैशिष्ट्य म्हणजे ते चवदार वाटत असले तरी ते बनवायला अगदी काही मिनिटे लागतात. सकाळचा नाश्ता तसेच संध्याकाळच्या चहाच्या वेळी तुम्ही बेसन ब्रेड टोस्ट घेऊ शकता. या खाद्यपदार्थाची रेसिपी माहिती करुन घ्या..

Advertisement

साहित्य- ब्रेडचे काही तुकडे, बेसन 1 कप, बारीक केलेला टोमॅटो अर्धा कप, बारीक केलेली शिमला मिरची अर्धा कप, बारीक केलेला कांदा अर्धा कप, कच्चा बटाटा किसलेला अर्धा कप, चाट मसाला 1/4 चमचा, लाल तिखट 1 चमचा, गरम मसाला 1/4 चमचा, बेकिंग सोडा चिमूटभर, तेल, मीठ चवीनुसार.

Advertisement

रेसिपी
बेसन ब्रेड टोस्ट बनवण्यासाठी प्रथम एक भांडे घ्या आणि त्यात बेसनपीठ टाका. यानंतर लाल तिखट, गरम मसाला, खाण्याचा सोडा, चाट मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून चांगले मिक्स करा. आता थोडे थोडे पाणी टाकून बेसनाचे जाडसर पीठ तयार करा. आता बेसनाच्या या पिठात कांदा, बटाटा, सिमला मिरची आणि टोमॅटो टाका आणि हे सर्व चांगले मिसळा आणि मिश्रण तयार करा.

Loading...
Advertisement

आता कढईत तेल टाकून मध्यम आचेवर गरम करायला ठेवा. तेल गरम झाल्यावर ब्रेडचे तुकडे घेऊन बेसनाच्या पिठात चांगले बुडवून तळण्यासाठी पॅनमध्ये ठेवा. आता ब्रेडचा रंग दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत 1 ते 2 मिनिटे तळून घ्या. ब्रेड कुरकुरीत झाल्यावर ताटात काढा. याच पद्धतीने बाकीचे ब्रेड टोस्ट तयार करुन घ्या. नाश्त्यासाठी तुमची स्वादिष्ट बेसन ब्रेड टोस्ट रेसिपी तयार आहे. चटणीबरोबर गरमागरम सर्व्ह करा.

Advertisement

स्वादिष्ट दाल पराठा बनवण्याची खास रेसिपी.. असा बनवा निरोगी नाश्ता..

Advertisement
Advertisement

Leave a Reply