Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Recipe : कमी वेळात ‘अशा’ पद्धतीने तयार करा टेस्टी अन् हेल्दी इडली.. ही आहे सोपी रेसिपी..

अहमदनगर : दक्षिण भारतीय खाद्य पदार्थ इडली आता सर्वत्र प्रसिद्ध आहे. सकाळच्या नाश्त्यात अनेक ठिकाणी इडली असते. हा खाद्य पदार्थ स्वादिष्ट आहे तसेच आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. सांभर आणि खोबऱ्याच्या चटणीने इडलीची चव आणखी वाढते. जर तुम्हाला दक्षिण भारतीय खाद्य पदार्थ पसंत असतील आज आम्ही तुम्हाला हॉटेल स्टाइल स्वादिष्ट इडली घरी कशी बनवायची ते सांगणार आहोत. दिवसभरात थोडी भूक लागली असेल आणि तुम्ही आरोग्याबाबत जागरूक असाल, तर नाश्ता म्हणून इडली हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. इडली खायला जितकी स्वादिष्ट आहे तितकीच ती बनवायलाही सोपी आहे. तुम्ही खूप कमी वेळात इडली तयार करू शकता.

Advertisement

साहित्य- तांदूळ 3 कप, उडदाची डाळ 1 वाटी, बेकिंग सोडा 1/2 चमचा, तेल आणि मीठ चवीनुसार.

Advertisement

रेसिपी
दक्षिण भारतीय स्टाइल इडली बनवण्यासाठी सर्वप्रथम उडीद डाळ आणि तांदूळ घ्या. ते पाण्याने स्वच्छ करा, त्यानंतर त्यांना 8-9 तास वेगळ्या भांड्यात भिजू द्या. ठरलेल्या वेळेनंतर तांदळातील पाणी काढून मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पेस्ट बनवा. तसेच उडीद डाळ पाण्यातून काढून मिक्सरने पेस्ट तयार करा. आता दोन्ही पेस्ट एका मोठ्या भांड्यात मिसळा आणि चमच्याच्या मदतीने मिसळून घ्या आणि घट्ट मिश्रण तयार करा. आता या मिश्रणात बेकिंग सोडा आणि थोडे मीठ टाकून चांगले मिसळून घ्या. आता पेस्ट आंबवण्यासाठी 12-13 तास उबदार ठिकाणी ठेवा. जर पेस्ट खूप घट्ट असेल तर त्यात थोडे पाणी टाका.

Loading...
Advertisement

आता इडली बनवण्याचे भांडे घेऊन त्यात 2 वाट्या पाणी टाकून गॅसवर मंद आचेवर गरम करायला ठेवा. यानंतर साच्यात इडलीची पेस्ट टाकून इडली भांड्यात टाकून झाकण ठेवा. आता सुमारे 10 मिनिटे मोठ्या आचेवर इडल्या शिजू द्या. त्यानंतर गॅस कमी करा. आता इडलीच्या भांड्याचे झाकण काढून इडली चांगली शिजली आहे का ते तपासा. इडली शिजली असेल तर साचा काढून त्यातून इडल्या काढून घ्या. त्यानंतर सांभर आणि नारळाच्या चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करता येईल.

Advertisement

नवीन वर्षात चीजपासून बनवा हा हटके चविष्ट नाश्ता.. मुले होतील खुश

Advertisement
Advertisement

Leave a Reply