Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

जिरे टाकून ‘अशा’ पद्धतीने तयार करा तांदळाचे पापड; रेसिपीही आहे एकदम सोपी..

अहमदनगर : आता हिवाळा कमी जाणवत आहे. काही दिवसांत कडाक्याच्या उन्हाळ्यास सुरुवात होईल. अशा वेळी घराघरात पापड तयार करण्यास सुरुवात होईल. आपल्याकडे उन्हाळ्याच्या दिवसात वेगवेगळ्या प्रकारचे पापड तयार केले जातात. बटाटा, रवा, मैदा पापड तयार केले जातात. पण, आज आम्ही तुम्हाला तांदळाचे पापड कसे तयार करायचे याची एक खास रेसिपी सांगणार आहोत. तसे पाहिले तर तांदळाचे पापड काही नवीन प्रकार नाही. मात्र, वेगळ्या पद्धतीने तुम्ही हे टेस्टी पापड तयार करू शकता. चला तर मग जाणून घेऊ या तांदळाचे पापड बनवण्याची सोपी रेसिपी.

Advertisement

साहित्य- 1 कप तांदूळ, 1 ते 2 चमचे तेल, चवीनुसार मीठ,अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मिरची

Advertisement

रेसिपी
सर्वात आधी एका मोठ्या भांड्यात तांदूळ किमान 2 दिवस भिजत ठेवा. असे केल्याने तांदूळ चांगल्या प्रकारे मऊ होतात. तुम्हाला फक्त तांदळाचे पाणी वेळोवेळी बदलावे लागेल. नंतर बारीक करून घ्या. आता कढई गरम करून त्यात हे द्रावण टाका आणि नंतर त्यात मीठ, जिरे आणि मिरची टाका. मिरची ऐच्छिक आहे, तुम्हाला वाटत असल्यास मिरची नाही टाकली तरी चालेल. कढईत मिश्रण चांगले घट्ट करा.

Loading...
Advertisement

घट्ट झाल्यावर ते एका भांड्यात काढा आणि गव्हाचे पीठ जसे मळतो त्या पद्धतीने चांगले मळून घ्या. नंतर गुळगुळीत झाल्यावर त्याचे छोटे तुकडे करून पातळ लाटून कापडावर ठेवावे. त्यानंतर वाळण्यास ठेऊन द्या, सकाळी सूर्य प्रकाशात पापड काही वेळ ठेवा. अशा पद्धतीने तुम्ही टेस्टी तांदळाचे पापड तयार करू शकता.

Advertisement

नाश्त्यात पोहे तयार करण्यासाठी सर्वात सोपी रेसिपी; पोहे होतील आधिक टेस्टी अन् हेल्दी..

Advertisement
Advertisement

Leave a Reply