अहमदनगर : आपल्याकडे दिवसाची सुरुवात चहा आणि नाश्त्याने होते. सकाळी घराबाहेर पडताना नेहमी पोटभर नाश्ता (breakfast) केलेला असणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असते. त्यामुळे सकाळी नाश्ता करणे आवश्यक असल्याचे वैद्यकिय तज्ज्ञही सांगत असतात. काही वेळेस मात्र, वेळेअभावी किंवा सकाळी भूक न लागल्यामुळे बरेच लोक नाश्ता घेत नाहीत. त्यामुळे आरोग्यास त्रास सहन करावा लागू शकतो. जर तुम्ही नाश्त्यासाठी सोपा आणि टेस्टी खाद्य पदार्थ बनवण्याची रेसिपी शोधत असाल तर आज पोहे तयार करा.
तुम्ही पोहे अनेक प्रकारे बनवू शकता, पण आज आम्ही तुम्हाला पोहे बनवण्याची सर्वात सोपी रेसिपी (poha recipe) सांगणार आहोत. तसे पाहिले तर प्रत्येक घरात पोहे तयार केले जातात. मात्र, या सोप्या आणि वेगळ्या पद्धतीने तुम्ही आधिक स्वादिष्ट पोहे तयार करू शकता.
साहित्य- 2 कप पोहे, 2 चमचे तेल/तूप, चिमूटभर हिंग, 1 चमचा मोहरी, 1 बारीक केलेला कांदा, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, 2 चमचे बारीक केलेली हिरवी मिरची, अर्ध्या लिंबाचा रस, 4 चमचे बारीक केलेली कोथिंबीर.
रेसिपी
पोहे बनवण्यासाठी आधी पोहे स्वच्छ करून घ्या. तुम्ही पोहे पाण्याने स्वच्छ करू शकता. फक्त जास्त वेळ पोहे पाण्यात ठेवू नका. आता कढईत तेल किंवा तूप टाका. गरम तेलात हिंग आणि मोहरी टाका. जर कढीपत्ता असेल तर ते देखील टाकता येईल. त्यानंतर यामध्ये बारीक केलेला कांदा टाका. कांदा हलका सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. आता त्यात हळद टाका. आता त्यात मीठ आणि पोहे टाका. नीट मिसळून तळून घ्या. आता गॅस मंद करा आणि त्यात बारीक केलेल्या हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाका.
आता त्यात लिंबाचा रस आणि कोथिंबीर टाका. तुम्हाला हवे असल्यास त्यावर बारीक केलेला टोमॅटो आणि चाट मसाला देखील टाकू शकता. काही लोकांना तेलात तळलेल्या हिरव्या मिरच्या आणि त्याबरोबर कच्चा कांदाही पसंत असतो. त्यात तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्याही टाकू शकता. याबरोबर चटणी किंवा करी भाजीही सर्व्ह करू शकता. त्यात तुम्ही भाजलेले शेंगदाणेही टाकू शकता.
नव्या वर्षात नाश्त्यासाठी तयार करा स्पेशल इंदोरी पोहे.. ही आहे अगदी सोपी रेसिपी..