Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

विखेंच्या ‘रॉकेट’ला शिवसेनेची काडी..! पहा वाईनप्रकरणी काय म्हणतायेत दोन्ही गट

अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे देशाचे सुपुत्र असून कुणी एखाद्या वृत्तपत्रात त्यांच्यावर अग्रलेखाच्या माध्यमातून टीका करत असेल तर अग्रलेख लिहिणारे हे वाईन घेऊन लिहित असतील. वाईन पिऊन त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असेल, अशी टीका भाजपचे खासदार सुजय विखे यांनी मंगळवारी केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना शिवसेनेचे नगर उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी खासदार डॉ. सुजय विखे यांच्यावर टीका केली आहे.

Loading...
Advertisement

जाधव यांनी म्हटले आहे की, लोणी येथील आपल्या मालकीच्या प्रवरा कारखान्यात रॉकेट नावाची देशी दारू तयार करता त्याची चव चाखून खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करत असाल तर त्याविषयी बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही. प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाधव यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले आहे की, प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात आणि वरिष्ठ नेत्यांच्या नजरेत, चर्चेत यावे या उद्देशाने खासदार विखे हे बेताल वक्तव्य करीत आहेत. मध्यंतरी खासदार सुप्रिया सुळे यांनी वक्तव्य करून तुम्हाला तुमची जागा दाखवून दिली तरी देखील तूम्हाला उपरती झाली नाही. हे दुर्दैवी आहे. स्वतःच्या स्वार्थापोटी दलबदलू राजकारण करणे ही आपल्या घराण्याची खासियत आहे. शिवसेना आणि अन्य व्यक्तींवर विखे पिता पुत्र टीका करत आहेत. तुमच्या कारखान्यात तयार होणारी रॉकेट ही देशी दारू आपण चंद्रपूर येथे दारूबंदी असताना विकत होता. तिथली दारूबंदी उठवण्यासाठी आपण किती आकांड तांडव केला होता. महाराष्ट्रात मागील काळात दुष्काळ असताना तुम्ही औरंगाबाद येथील बिअर कंपन्यांना पाणी मिळावे व कंपन्या सुरु रहाव्यात यासाठी मुळा धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्यासाठी किती खटाटोप केला हे सर्वाना माहिती आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply