Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

लंकेंनी केलाय मोठाच खेळ..! पारनेर नगराध्यक्षपदासाठी विजय औटीच..!

अहमदनगर : एकेकाळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार विजय औटी यांचे कट्टर समर्थक अशीच विद्यमान आमदार निलेश लंके यांची ओळख होती. मात्र, मागील पाच वर्षात पुलाखालून मोठ्या प्रमाणात पाणी गेले आहे. कारण लंके यांनी विधानसभा निवडणुकीत विजय औटी यांना पराभूत करून राजकीयदृष्ट्या ताकद वाढवली आहे. आता पारनेर नगर पंचायतीच्या निवडणुकीत लंके यांनी शिवसेनेच्या औटी गटाला पुन्हा एकदा धोबीपछाड केले आहे.

Advertisement

सतरा सदस्यांच्या पारनेर नगर पंचायतीत सहयोगी सदस्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा, शिवसेनेचे सहा तर भाजपचा एक सदस्य असे बलाबल आहे.  दरम्यान, नगराध्यपदासाठी अर्ज दाखल करताना राष्ट्रवादीने अपेक्षेप्रमाणे आमदार नीलेश लंके यांचे निकटवर्तीय विजय सदाशिव औटी यांचा अर्ज दाखल केला. तर शिवसेनेच्या वतीने नवनाथ सोबले यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. एकूण गणित लक्षात घेता येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष होणार असेच चित्र आहे. निकालानंतर आमदार लंके यांनी हालचाली करून तीन अपक्ष नगरसेवकांना गळाला लावत जिल्हाधिकाऱ्यांकडे नऊ सदस्यांची गटनोंदणी केली होती. पूर्ण बहुमत असतानाही खबरदारीचा उपाय म्हणून सहयोगी सदस्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांना सहलीसाठी पाठवण्यात आले आहे. बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास सहलीसाठी गेलेले नगरसेवक पारनेरमध्ये दाखल झालेले आहेत. त्यामुळे आजच दुपारी १२ वाजता नगराध्यक्षपदासाठी विजय औटी यांची निवड अपेक्षित आहे.

Loading...
Advertisement

पारनेर नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी विजय औटी यांना तर उपनगराध्यक्ष पदासाठी सुरेखा भालेकर यांना मतदान करावे, असा पक्षादेश (व्हीप) मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसह सहयोगी सदस्यांना बजावण्यात आला. त्यामुळे नगराध्यक्षपदी औटी यांची तर उपनगराध्यक्षपदी भालेकर यांची निवड निश्चित मानली जात आहे. बुधवारी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होत आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply