Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Recipe : अशा पद्धतीने बनवा टेस्टी अन् हेल्दी बटाटा-पालक; पहा, काय आहे सोपी रेसिपी

अहमदनगर : पालक हा अनेक गुणधर्मांनी समृद्ध आहे. आरोग्यासाठी सुद्धा अत्यंत फायदेशीर आहे. त्यामुळे आपल्याकडे आहारात पालकाचा समावेश केला जातो. आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने पालकाची भाजी तयार केली जाते. आता तर हॉटेलमध्ये सुद्धा पालकाची भाजी मिळते. अशा परिस्थितीत तुम्हाला हॉटेल स्टाइल पालकाची वेगळी रेसिपी तयार करायची असेल तर बटाटा पालक भाजी एक वेगळा पर्याय ठरू शकतो. या भाजीची रेसिपी सुद्धा सोपी आहे. त्यामुळे हा वेगळा खाद्य पदार्थ तुम्ही अगदी कमी वेळेत तयार करू शकता.

Advertisement

साहित्य- तेल/तूप, सुकी लाल मिरची 3 ते 4, हिंग अर्धा चमचा, जिरे 2 चमचे, बारीक केलेला लसूण- एक चमचा, बारीक केलेला कांदा 3/4 कप, बारीक केलेला अद्रक 1 चमचा, बारीक केलेली हिरवी मिरची 1 चमचा, सोललेला आणि बारीक केलेला बटाटा 2 कप, हळद 3/4 चमचा, मिरची पावडर – 1½ चमचा, धने पावडर 1½ चमचा, बारीक केलेला टोमॅटो 1 कप, मीठ चवीनुसार, कसुरी मेथी 2 चमचे आणि पालक.

Advertisement

रेसिपी
सर्वात आधी कढई गरम करून तेल टाका. सुक्या मिरच्यांचे 2 तुकडे करून गरम तेलात टाका. यानंतर तेलात हिंग आणि जिरे टाका. काही सेकंद मिसळा आणि लसूण टाका. लसूण तपकिरी होईपर्यंत मोठ्या आचेवर शिजू द्या आणि नंतर त्यात कांदा टाका. त्यानंतर अद्रक आणि हिरवी मिरची टाका. कांदे अर्धे शिजेपर्यंत शिजू द्या, कांदा तपकिरी होणार नाही याची काळजी घ्या. हळद, लाल तिखट आणि धने पावडर टाकून चांगले मिक्स करुन घ्या. यानंतर टोमॅटो आणि थोडे मीठ टाकून 2-3 मिनिटे मंद आचेवर शिजू द्या.

Loading...
Advertisement

आता बटाट्याचे तुकडे टाकून परतावे. वाळलेली कसुरी मेथी टाका आणि 3-4 मिनिटे शिजू द्या आणि नंतर थोडे पाणी शिंपडा आणि गॅस कमी करा. बटाटे मऊ आणि पूर्ण शिजेपर्यंत शिजू द्या. शिजलेल्या बटाट्यात बारीक केलेला पालक टाकून त्याचे सर्व पाणी जाईपर्यंत शिजू द्या. पालक जास्त दिसला तरी वितळल्यानंतर फारच कमी राहील हे लक्षात ठेवा. त्यानंतर तुमची टेस्टी बटाटा पालक भाजी तयार आहे. तुम्ही पराठा किंवा रोटीबरोबर गरमागरन बटाटा पालक भाजी सर्व्ह करू शकता.

Advertisement

नाश्त्यात वेगळे काहीतरी.. ‘अशा’ पद्धतीने तयार करा टेस्टी अन् हेल्दी जीरा पराठा; रेसिपी माहिती करुन घ्या..

Advertisement
Advertisement

Leave a Reply