Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

नाश्त्यात वेगळे काहीतरी.. ‘अशा’ पद्धतीने तयार करा टेस्टी अन् हेल्दी जीरा पराठा; रेसिपी माहिती करुन घ्या..

अहमदनगर : प्रत्येकाने कधी ना कधी साधे पराठे खाल्ले असतील, पण तुम्ही कधी जिरा पराठा करून पाहिला आहे का ? नसल्यास, तुम्ही नाश्त्यात जीरा पराठा नक्कीच ट्राय करू शकता. सकाळच्या व्यस्त वेळापत्रकामुळे अनेकदा असे घडते की नाश्ता बनवायला फारसा वेळ मिळत नाही, अशा परिस्थितीत कमी वेळात बनवायची रेसिपी म्हणून जीरा पराठ्याची रेसिपी करून पाहता येईल. जीरा पराठ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी वेगळे काही बनवावे लागत नाही. तुम्ही जिरा पराठा दही, चटणी किंवा लोणच्याबरोबरही खाऊ शकता.

Advertisement

साध्या पराठ्यापेक्षा जिरा पराठा आरोग्यासाठी खूप चांगला ठरेल. जर तुम्हाला ते तुमच्या घरी बनवायचे असेल तर आम्ही तुम्हाला सर्वात सोपी रेसिपी सांगणार आहोत, ज्यामुळे जीरा पराठा अगदीच कमी वेळात तयार होईल.

Advertisement

साहित्य- पीठ 1 वाटी, जिरे अर्धा चमचा, लाल तिखट 1/4 चमचा, चाट मसाला अर्धा चमचा, गरम मसाला 1/4 चमचा, तेल, मीठ – चवीनुसार.

Loading...
Advertisement

रेसिपी
जीरा पराठा बनवण्यासाठी प्रथम एक भांडे घ्या आणि त्यात पीठ चाळून घ्या. यानंतर पीठ मळून घ्या आणि थोडावेळ कापडाने झाकून ठेवा. आता पीठ घ्या आणि परत एकदा मळून घ्या आणि नंतर थोडे लाटून घ्या. यानंतर चाट मसाला, गरम मसाला, लाल तिखट, जिरे आणि थोडे तेल टाकून त्याचा गोळा तयार करून पुन्हा त्यास पराठ्याचा आकार द्या.

Advertisement

आता नॉनस्टिक तवा घेऊन गॅसवर मंद आचेवर ठेवा. त्यावर थोडे तेल टाकून सगळीकडे पसरवा. आता त्यावर लाटलेला पराठा ठेवा आणि थोडा वेळ भाजून घ्या नंतर पराठा उलटा. आता दुसऱ्या बाजूने तेल लावून पराठा भाजून घ्या. पराठा दोन्ही बाजूंनी गोल्डन ब्राऊन होईल अशा पद्धतीने भाजून घ्या. त्यानंतर वेगळ्या प्लेटमध्ये काढून घ्या. या प्रमाणे सर्व गोळ्यांचे पराठे बनवा. आता नाश्त्यात जीरा पराठा दही किंवा चटणीबरोबर सर्व्ह करा.

Advertisement

आजची रेसिपी : हिवाळ्यात घरी तयार करा स्पेशल गुळाचा पराठा; जाणून घ्या, काय आहे रेसिपी

Advertisement
Advertisement

Leave a Reply