Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

घरीच तयार करा हॉटेल स्टाइल ब्रेड भजे; नाश्त्यासाठी ठरेल वेगळे काहीतरी.. ही आहे सोपी रेसिपी

अहमदनगर : भज्यांशिवाय पावसाळा अपूर्ण असतो. पण, हिवाळ्याच्या दिवसात सुद्धा भजे खाण्याची एक वेगळीच मजा असते. आपल्याकडे कांदा भजे, पालकाचे भजे, बटाटा भजे फेमस आहेतच. सकाळच्या नाश्यात चहाबरोबर भजे असले तर नाश्त्याची चव काही वेगळीच असते. भजे तयार करण्याचे प्रकार आणि पद्धतीही वेगळ्या आहेत. आपल्याकडे सकाळच्या नाश्त्यात पोह्यांचे प्रमाण जास्त आहे. बहुतेक घरांमध्ये नाश्त्यासाठी पोहे असतात. काही जण चहा आणि ब्रेड पसंत करतात. पण, तुम्हाला माहित आहे, की ब्रेडपासूनही स्वादिष्ट भजे तयार करता येतात.

Advertisement

ब्रेडपासून भजे तयार करण्याची पद्धत सुद्धा खूप सोपी आहे. हिवाळ्याच्या दिवसात सकाळच्या नाश्त्यात हा एक वेगळा आणि चांगला पर्याय ठरू शकतो. ब्रेड पकोड्यांची चव खूप छान लागते, पण कधी-कधी घरी खूप मेहनत करूनही आपल्याला हॉटल स्टाइल ब्रेड पकोडे बनवता येत नाहीत. आज आम्ही तुम्हाला अशी एक रेसिपी सांगत आहोत, ज्याद्वारे तुम्ही हॉटेल स्टाइल ब्रेड पकोडे बनवू शकता.

Advertisement

साहित्य- 1 चमचा तेल,1 चमचा मोहरी, 1 चमचा कढीपत्ता, 1 चमचा हिंग, 2 हिरव्या मिरच्या, 1 चमचा अद्रक पेस्ट, 1 बटाटा (उकडलेले), 3 चमचे मीठ, 1 1/2 चमचा हळद, 1 1/2 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा कोथिंबीर, 1 कप बेसन, 1/2 चमचा ओवा, 1/4 कप तांदळाचे पीठ, 2 ब्रेडचे तुकडे

Loading...
Advertisement

रेसिपी
सर्वात आधी एक कढई घेऊन त्यात थोडे तेल गरम करून त्यात मोहरी, कढीपत्ता आणि हिंग टाका. यानंतर अद्रक पेस्ट आणि हिरवी मिरची टाकून मिक्स करा. आता त्यात उकडलेले बटाटे, मीठ, हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि कोथिंबीर टाका. चांगले मिसळा आणि मिश्रण तयार करा. एका भांड्यात बेसन, लाल तिखट, मीठ, हळद, ओवा, तांदळाचे पीठ आणि थोडे पाणी घ्या.

Advertisement

हे सर्व साहित्य नीट मिसळा आणि पीठ तयार करा. ब्रेडचे तुकडे घ्या, त्यावर बटाट्याचे तयार केलेले मिश्रण ठेवा. ब्रेड स्लाइसचे दोन तुकडे करा. आता हे ब्रेडचे तुकडे बेसनाच्या पिठात बुडवून घ्या. गरम तेलात तळून घ्या. अशा प्रकारे तुमचे टेस्टी ब्रेडचे भजे तयार होतील त्यानंतर गरमागरम सर्व्ह करा.

Advertisement

वाव.. पोह्यांपासून बनवा टेस्टी भजे..! नाश्त्यासाठी ठरेल बेस्ट पर्याय; जाणून घ्या, अशी आहे रेसिपी..

Advertisement
Advertisement

Leave a Reply