Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

नाश्त्यात ‘या’ पदार्थांचा करा समावेश; राहाताल फिट आणि वजनही होईल कमी; जाणून घ्या..

अहमदनगर : सकाळचा नाश्ता नेहमी पोटभर आणि शक्यतो पौष्टिक गोष्टी नाश्त्यात घ्याव्यात, असे नेहमी सांगितले जाते. कारण सकाळचा नाश्ता अतिशय खास मानला जातो. सकाळचा नाश्ता तुम्हाला ऊर्जा देण्याचे काम करतो. पण अनेकवेळा असे लोक सकाळचा नाश्ता टाळतात ज्यांना वजन कमी करायचे असते. न्याहारी केल्याने वजन वाढणार तर नाही ना असे त्यांना वाटते.

Advertisement

ही भीती दूर करण्यासाठी नाश्त्यामध्ये अशा काही गोष्टींचा समावेश का करू नये, ज्यामुळे तुम्ही दिवसभर उत्साही राहाल. याबरोबरच वजन कमी करण्याचा तुमचा उद्देशही पूर्ण होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊ या वजन कमी करण्यासाठी नाश्त्यामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश करावा.

Advertisement

सकाळच्या नाश्त्यात दही समाविष्ट करू शकता. हे पोषक तत्वांनी परिपूर्ण असून आरोग्यासाठी फायदेशीर आहे. याबरोबरच तुमचे वजन कमी करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यातही ते चांगली भूमिका बजावते. दही खाल्ल्याने पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते. याबरोबरच यामध्ये असलेले कॅल्शियम तुमची हाडे मजबूत करण्याचे काम करते.

Advertisement

 घरच्या घरीच बनवा आलू मसाला सँडविच.. सकाळचा नाश्ता होईल स्वादिष्ट

Loading...
Advertisement

. खरेदिवाला म्हणजे ऑफरवाला. https://bit.ly/3gpEvq9 यावर क्लिक करून करा खरेदी दणक्यात..!

Advertisement

. नाश्त्यात असू द्या ‘हे’ हेल्दी खाद्य पदार्थ; राहाल तंदुरुस्त, आरोग्यासाठीही ठरेल फायदेशीर

Advertisement

तुम्ही नाश्त्यात उपमाचाही समावेश करू शकता. यामुळे तुम्हाला भरपूर ऊर्जा मिळते. उपमामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते ज्यामुळे तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. यासोबत तुम्ही सतत काहीही खात नाही. उपमा कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासही मदत करते.

Advertisement

मूग डाळ तुमचे वजन कमी करण्यात चांगली भूमिका बजावते. यामुळे आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. मुगाच्या डाळीमध्ये भरपूर फायबर असते जे तुमचे पोट भरलेले ठेवण्यास मदत करते. यामध्ये भरपूर प्रोटीन देखील असते, जे शरीरासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्यामुळे तुम्ही तुमच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये मूग डाळ देखील समाविष्ट करू शकता.

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply