अहमदनगर : आज आम्ही तुमच्यासाठी आणखी एक वेगळी आणि स्वादिष्ट रेसिपी घेऊन आलो आहोत. पनीरचे टेस्टी खाद्यपदार्थ अनेक आहेत. आपल्याकडे पनीरला जास्त मागणी आहे. हॉटेलमध्ये तर पनीरच्या वेगवेगळ्या भाज्यांना कायमच मागणी असते. तसेच आपण सुद्धा कधीतरी घरी पनीरची भाजी तयार करतोच ना. म्हणून आज आम्ही अशीच पनीरची वेगळी रेसिपी बद्दल माहिती देणार आहोत. पनीर कोरमा बनवणे खूप सोपे आहे, ते बनवण्यासाठी तुम्हाला काही महत्वाच्या टिप्स फॉलो कराव्या लागतील. चला तर मग, जाणून घ्या पनीर कोरमा कसा तयार करतात.
साहित्य- 300 ग्रॅम पनीर, 1 कप पाणी, 1 कांदा, 1 टोमॅटो, 5 काजू, 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट, १ चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची, अर्धा चमचा हिरवी मिरची पेस्ट, 2 चमचे खसखस, खोबरे, 2 चमचे कोथिंबीर, 2 चमचे तेल आणि चवीनुसार मीठ.
रेसिपी
पनीर कोरमा बनवण्यासाठी प्रथम कांदा आणि टोमॅटो बारीक करुन घ्या. आता खसखस, काजू आणि खोबरे मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. तसेच थोडे पाणी टाकून पेस्ट तयार करा. आता कढईत तेल टाकून गरम करा. गरम तेलात तमालपत्र आणि वेलची तळून घ्या. आता त्यात कांदा टाकून मंद आचेवर तळून घ्या. कांदा हलका तपकिरी रंगाचा होऊ लागेल. या मिश्रणात हिरवी मिरची पेस्ट, अद्रक लसूण पेस्ट टाकून हे मिश्रण तळून घ्या.
त्यानंतर त्यात बारीक केलेला टोमॅटो टाका, मीठ, तिखट आणि हळद टाकून मिश्रण तळून घ्या. मिश्रण 2 मिनिटे शिजू द्या. आता खसखस पेस्ट आणि पाणी टाकून शिजू द्या. भाजी 5 मिनिटे शिजू द्यावी. या मिश्रणात पनीरचे बारीक तुकडे टाका, तसेच गरम मसाला टाकून भाजी 2 मिनिटे शिजू द्या. तुमचा स्वादिष्ट पनीर कोरमा तयार आहे, एका भांड्यात काढा, वर कोथिंबीर टाका आणि सर्वांना गरमागरम सर्व्ह करा.
आजची रेसिपी : अशा प्रकारे तयार करा पनीर रोल.. प्रत्येकजण विचारेल रेसिपी