Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

वेगळे काहीतरी : ‘अशा’ पद्धतीने घरी तयार करा टेस्टी अन् हेल्दी ड्रायफ्रूट बर्फी; काही मिनिटांत होईल तयार..

अहमदनगर : आपल्याकडे सण समारंभानिमित्त अनेक गोड पदार्थ तयार केले जातात. अशा वेळी बर्फी नेहमीच दिसते. बर्फीचेही अनेक प्रकार आहेत. त्यामुळे बर्फी तयार करताना नेहमीच विचार असतो की कोणती बर्फी तयार करावी. शक्यतो आपण घरी बर्फी तयार करत नाही. दुकानातून खरेदी करण्यास प्राधान्य असते. बर्फी तयार करण्यास अवघड आहे, असाही अनेकांचा समज असतो. पण, तसे मात्र नाही. तुम्हीही अगदी काही वेळात घरच्या घरी स्वादिष्ट बर्फी तयार करू शकता. आज आम्ही तुम्हाला अशीच बर्फी तयार करण्याची एक सोपी रेसिपी सांगणार आहोत, ही बर्फी आहे ड्रायफ्रुट्स बर्फी. ड्रायफ्रूट बर्फी खाण्यास स्वादिष्ट तर आहेच शिवाय आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. त्याच बरोबर बनवायला पण अगदी सोपी आहे, त्यामुळे तुम्ही सुक्या मेव्यापासून बर्फी तयार करू शकता. चला तर मग जाणून घेऊ या ही ड्रायफ्रूट बर्फी तयार करण्याची रेसिपी..

Advertisement

साहित्य- ड्रायफ्रूट बर्फी बनवण्यासाठी दोनशे ग्रॅम काजू, आठ ते दहा बदाम, दहा ते पंधरा पिस्ते, सरबत किंवा स्ट्रॉबेरी इसेन्स आवश्यक आहे. हवे असल्यास चवीनुसार व्हॅनिला इसेन्सही टाकू शकता.

Advertisement

रेसिपी
सर्व प्रथम काजू बारीक करून पावडर बनवा. पांढरे तीळ एकत्र तळून ठेवावे. आता एका पॅनमध्ये तूप टाका. जरा गरम झाल्यावर त्यात काजू पावडर, भाजलेले तीळ आणि बदाम, काजू, पिस्ता टाकून भाजून घ्या. सुका मेवा जास्त भाजला जाणार नाही याची काळजी घ्या. त्यांना सोनेरी करू नका. फक्त आतील ओलावा काढून टाका. आता या मिश्रणात स्ट्रॉबेरी सिरप टाका. हे मिश्रण भाजून थोडे कोरडे करा.

Loading...
Advertisement

आता तूप ट्रेमध्ये किंवा सपाट थाळीत ठेवा. नंतर या बर्फीचे मिश्रण ट्रेवर पसरवा. यावर लांब आकारात कापलेले पिस्ते ठेवा. हे मिश्रण दोन ते तीन तास सेट करण्यासाठी ठेवा. थंड झाल्यावर या बर्फीचा आकार करून घ्या. अशा पद्धतीने तुम्ही घरीच स्वादिष्ट ड्रायफ्रूट बर्फी तयार करू शकता.

Advertisement

आजची रेसिपी : वाटाण्यापासून तयार करा टेस्टी अन् हेल्दी बर्फी; जाणून घ्या, सोपी रेसिपी..

Advertisement
Advertisement

Leave a Reply