Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

वेगळे काहीतरी..! ‘अशा’ पद्धतीने तयार करा गाजराचा टेस्टी हलवा; ही आहे सोपी रेसिपी..

अहमदनगर : हिवाळ्यात आपण अनेक प्रकारच्या मिठाई खातो. या दिवसात काहीतरी गोड खाद्यपदार्थ अनेक जण पसंत करतात. बेसनाचा हलवा, गुळाची चिक्की आणि असेच अन्य खाद्यपदार्थ घरात तयार केले जातात. बाजारात सुद्धा अनेक प्रकारच्या मिठाई उपलब्ध असतात. पण या सर्वांमध्ये गाजराचा हलवा खास आहे. आता गाजर हलवा हा सुद्धा एक स्वादिष्ट खाद्य पदार्थ आहे. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घरीच गाजर हलवा बनवण्याची रेसिपी घेऊन आलो आहे. चला तर मग येथे माहित करुन घ्या, की गाजराचा हलवा कसा तयार करतात. गाजर हलवा हा असा स्वादिष्ट खाद्यपदार्थ आहे जो सर्व वयोगटातील बहुतेक लोकांना आवडतो. तुम्हालाही या हिवाळ्यातील हलव्यासारखा गाजराचा हलवा बनवायचा असेल तर गाजराच्या हलव्याची ही रेसिपी नक्की करून पहा.

Advertisement

साहित्य- अर्धा किलो गाजर किसलेले, 6 कप दूध, काजू आणि बदाम बारीक केलेले, साखर 4 चमचे, तूप 3 चमचे, अर्धा कप फ्रेश मलाई.

Loading...
Advertisement

रेसिपी
गाजराचा हलवा बनवण्यासाठी सर्वात आधी गाजर पाण्याने स्वच्छ करा. नंततर किसून घ्या. आता एका कढईत तूप गरम करा, त्यात किसलेले गाजर टाका आणि मंद आचेवर सुमारे 20 मिनिटे परतून घ्या. गाजराचा रंग थोडा गडद झाला की त्यात साखर टाकून 2-3 मिनिटे शिजू द्या. आता मलई टाकून परत काही वेळ शिजू द्या. यानंतर, गाजरामध्ये दूध टाकून ते कोरडे होईपर्यंत शिजू द्या. गाजराचा हलवा थोडा क्रीमी दिसू लागला की गॅस बंद करा. वर ड्रायफ्रुट्स टाकून सर्व्ह करा. अशा पद्धतीने तुम्ही हॉटेल स्टाइल गाजर हलवा घरीच तयार करू शकता.

Advertisement

वेगळे काहीतरी : ‘अशा’ पद्धतीने घरीच तयार करा टेस्टी बेसनाचा हलवा; ही आहे सोपी रेसिपी..

Advertisement
Advertisement

Leave a Reply