अहमदनगर : हिवाळ्याच्या दिवसात सकाळच्या चहा बरोबर काहीतरी मसालेदार नाश्ता खाण्याचा ट्रेंड वाढत आहे. तसेही सकाळी घरातून बाहेर पडताना पोटभर नाश्ता केला असेल तर दिवसही चांगला जातो. फार भूक लागत नाही. त्यामुळे नाश्त्यात नेहमीच पौष्टिक आणि तितकेच स्वादिष्ट पदार्थ असावेत, यावर प्रत्येकाचा भर असतो. पोहे, उपमा, इडली सांबर यांसारखे पदार्थ नाश्त्यात जास्त पसंत केले जातात.
यापेक्षा जर काहीतरी वेगळे तयार करायचे असेल तर तुम्ही पालक पनीर रोल ट्राय करू शकता. हा खाद्य पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच स्वादिष्टही आहे. आणि विशेष म्हणजे, तयार करण्यासाठी फार वेळही लागत नाही. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात काहीतरी वेगळे पाहिजे असेल तर पालक पनीर काठी रोल बेस्ट पर्याय ठरेल. आज पालक पनीर रोल कसा तयार करतात, याची माहिती घेऊ या..
साहित्य – पालक पराठ्यासाठी मैदा 1 कप, पालक प्युरी अर्धा कप, बारीक केलेली मिरची 1, जिरे पावडर अर्धा चमचा, मीठ चवीनुसार, तेल आवश्यकतेनुसार, किसलेले पनीर 150 ग्रॅम, बारीक केलेली मिरची 2, बारीक केलेला लसूण 5 पाकळ्या, बारीक केलेला कांदा 1, बारीक केलेली कोथिंबीर 4 चमचे, बारीक केलेला टोमॅटो 1, लाल तिखट 1 चमचा, गरम मसाला पावडर 2 चमचे, हळद पावडर अर्धा चमचा, मोहरी सॉस 4 चमचे, टोमॅटो पास्ता सॉस 4 चमचे, मीठ चवीनुसार
रेसिपी
सर्वात आधी पालकाची प्युरी तयार करताना त्यात मिरच्याही टाका. एका भांड्यात मैदा, पालक प्युरी, जिरे पावडर आणि मीठ एकत्र करून पीठ तयार करुन घ्या. आवश्यक असल्यास थोडेसे पाणी देखील वापरा. शेवटी एक चमचा तेल टाका. पीठ अधिक चांगले तयार करुन घ्या. त्यानंतर या पीठाचे चार भाग करा. नॉनस्टिक पॅन गरम करा. कणकेतून गोल रोटी लाटून कढईत टाकून भाजून घ्या. थोडे तूप लावावे. पराठा तपकिरी होऊ लागला की तव्यातून पराठा काढा. असेच चारही पराठे बनवा. आता पनीर भुर्जी बनवा. भुर्जी बनवण्यासाठी सर्व साहित्य एका भांड्यात मिसळा. तयार पराठ्यावर प्रथम चमचाभर सॉस पसरवा. त्यावर भुर्जीचे मिश्रण ओतावे. पराठा लाटून सर्व्ह करा.
वेगळे काहीतरी : ‘अशा’ पद्धतीने घरीच तयार करा टेस्टी बेसनाचा हलवा; ही आहे सोपी रेसिपी..