अहमदनगर : हिवाळ्यात आपण अनेक प्रकारच्या मिठाई खातो. या दिवसात काहीतरी गोड खाद्यपदार्थ अनेक जण पसंत करतात. गाजराचा हलवा, गुळाची चिक्की आणि असेच अन्य खाद्यपदार्थ घरात तयार केले जातात. बाजारात सुद्धा अनेक प्रकारच्या मिठाई उपलब्ध असतात. पण या सर्वांमध्ये बेसन हलवा खास आहे. बेसनाचे लाडू तर आपणा सगळ्यांनाच माहिती आहेत.
आता बेसन हलवा हा सुद्धा एक स्वादिष्ट खाद्य पदार्थ आहे. तुम्ही बहुतेक ते काही खास समारंभावेळी किंवा दुकानातून विकत घेत असाल. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घरीच बेसन हलवा बनवण्याची रेसिपी घेऊन आलो आहे. चला तर मग येथे माहित करुन घ्या, की बेसनाचा हलवा कसा तयार करतात.
साहित्य – 1 कप बेसन, 2 कप दूध, साखर चवीनुसार, 100 ग्रॅम तूप, 4 वेलची, बारीक केलेला सुका मेवा.
रेसिपी
सर्वात आधी एक भांडे घ्या आणि त्यात बेसन पीठ भाजायला सुरुवात करा. यावेळी गॅस मंद ठेवा. आता त्यात दूध टाकून थोडावेळ असेच भाजून घ्या. आता गॅस बंद करा. त्यानंतर एक कढई घेऊन त्यात तूप गरम करा. आता वेलची बारीक करून त्यात टाका. बरोबरच साखर आणि पाणी टाकून साखरेचा पाक तयार करा. आता तयार पाकात भाजलेले बेसन टाकून थोडा वेळ शिजू द्या. हे मिश्रण सतत हलवत राहा, यावेळी गॅस मंद ठेवा. काही वेळाने त्यात ड्रायफ्रुट्स टाका. अजून थोडा वेळ शिजू द्या. काही वेळाने तुमचा हलवा तयार होईल.
घरीच तयार करा ढाबा स्टाइल डाळ तडका; माहिती करुन घ्या काय आहे रेसिपी..?