Take a fresh look at your lifestyle.

उद्योजक व व्यावसायिकांनी करावे ‘लिस्ट अ जॉब’ पहा नेमके काय केलेय आवाहन

अहमदनगर : सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र व राज्य शासन यांची सर्व कार्यालये आणि गृह/उद्योग/व्यवसाय/ महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी क्षेत्रातील 25 किंवा अधिक मनुष्यबळ कार्यरत असेल अशा सर्व आस्थापना, उद्योग, व्यापार, व्यवसाय, कारखान्यांना सेवायोजन कार्यालय (रिक्त पदाची सूचना देणे सक्तीचे) कायदा 1959 व त्या अंतर्गत नियमावली 1960 नुसार माहे 1 ऑक्टोबर 2021 ते 31 डिसेंबर 2021 या तिमाहीचे विवरणपत्र 30 जानेवारी 2022 पर्यंत सादर करणे बंधनकारक आहे. याप्रमाणे नियोक्त्यांच्या लॉग-इन मध्ये विवरणपत्र www.rojgar.mahaswayam.gov.in वेबपोर्टलवर ऑनलाईन सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. यासाठी उपरोक्‍त वेबसाइट ओपन करून एम्प्लॉयर (लिस्ट अ जॉब) वर क्लिक करुन एम्प्लॉयर लॉग इनमध्ये नियोक्त्यांचा युजर आयडी व पासवर्ड वापरून लॉग-इन करावे आणि ईआर रिपोर्ट मधील ई-आर 1 या ऑप्शनवर क्लिक करून ऑनलाइन सादर करणे आवश्यक आहे.

Advertisement

यामध्ये काही तांत्रिक अडचण आल्यास किंवा अधिकच्या सहाय्यासाठी सार्वजनिक सुट्ट्या वगळून सोमवार ते शुक्रवारदरम्यान सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांकावर (0241) 2995737 वर संपर्क साधावा. सेवायोजन कार्यालय (रिक्त पदाची सूचना देणे सक्तीचे) कायदा 1959 व त्या अंतर्गत नियमावली 1960 मधील तरतुदीनुसार वरील प्रमाणे सर्व आस्थापनांनी 31 डिसेंबर, 2021 अखेर आपल्या वेतन पटावर असलेल्या सर्व मनुष्यबळाची माहिती ईआर-1 विवरणपत्र 30 जानेवारी 2022 पूर्वी वरील वेबसाईटवर ऑनलाईन सादर करणे बंधनकारक आहे. त्यात कसूर झाल्यास कसूरदार आस्थापनांवर कायदेशीर कारवाई होऊ शकेल, याची नोंद घ्यावी असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अहमदनगर यांनी प्रसिध्दीपत्राद्वारे केले आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply