Take a fresh look at your lifestyle.

आधारभूत किंमतीने धान खरेदी केंद्रांची यादी जाहीर; पहा कुठे विकायचा आहे आपला शेतमाल

अहमदनगर : मागील पणन हंगामात सुरू असणारी खरेदी केंद्रे पणन हंगाम 2021-22 मध्ये सुरू ठेवण्याचे सूचित करण्यात आले आहे. तथापि अशी खरेदी केंद्रे सुरू करण्याअगोदर त्या खरेदी केंद्राबाबत मागील पणन हंगामामध्ये तक्रार नसल्याची खात्री अभिकर्ता संस्थांनी करावी आणि परिशिष्ट 6 (6.2) नुसार नवीन खरेदी केंद्र व खरेदी संस्था निवडीबाबत पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. सदर शासन निर्णयानुसार धान खरेदी दर आधारभूत किंमत पुढीलप्रमाणे निश्चित केली आहे. धान/भात (एफएक्यू) एक साधारण आधारभूत किंमत 1 हजार 940 रुपये व “अ” दर्जा आधारभूत किंमत 1 हजार 960 रुपये.  धान खरीप पणन हंगाम कालावधी 1 ऑक्टोबर 2021 ते 31जानेवारी,2022 आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित, नाशिक, प्रादेशिक कार्यालय, जुन्नर जिल्हा, पुणे यांचे कडील 25 ऑक्टोबर, 2021 रोजीच्या पत्रानुसार शासकीय आधारभूत किमतीने धान्य खरेदी करण्यासाठी पुढे नमूद ठिकाणी धान्य खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्र सुरू करण्याची विनंती करण्यात आलेली आहे.

Advertisement

उपप्रादेशिक कार्यालय, राजुर अंर्तत अकोले तालुका महामंडळाचे उपप्रादेशिक कार्यालय राजुर, खरेदी केंद्राचे नाव देशमुख वाडी, गोदामाचे नाव म.गोदाम, गोदामाचे ठिकाण राजुर अंतर्गतम राजुर, माणिक ओझर, कोठेवाडी, गोंदोषी, साकिरवाडी, आंबित, जानेवाडी, सावरकुटे, कुमशेत, पेनशेत, वारुंघुषी, ठाकरवाडी, अंबित, पाटीलवाडी, शेंबाळवाडी, हेंगाडवाडी,ठाकरवाडी, मान्हेरे,आंबेगव्हाण, लाडगाव,टिटवी, वाकी, बुलडण, मुतखेल, बारवाडी, कोलटेंभे, हवीरर, तळे, कोहणे, सोमलवाडी आंघोळ गंभीरवाडी, शिळवंडी, घोटी, पिंपरी, शेलद, देवगाव, पिंपरकणे, शेलविहिरे, धामणवन, शिरपुंजे, आंबी, खडकी व तालुक्यातील आदिवासी क्षेत्रातील इतर धान लागवड असलेल्या सर्व महसूली गावांचा समावेश आहे.

Advertisement

उपप्रादेशिक कार्यालय, राजुर अंर्तगत अकोले तालुका महामंडळाचे उपप्रादेशिक कार्यालय राजुर अकोले महामंडळाचे उपप्रादेशिक कार्यालय राजुर अंतर्गत पळसुंदे गोदामाचे नाव कोतुळ, गोदामाचे ठिकाण कोतूर, अंतर्गत पळसुंदे, उंबरेवाडी, कांबळेवाडी, पैठण, भोळेवाडी, पाडाळणे, पुरुषवाडी, शिसवद, बागदरी,लव्हाळी, ठाकरवाडी वांजुळशेत व तालुक्यातील आदिवासी क्षेत्रातील इतर धान लागवड असलेल्या सर्व महसूली गावांचा समावेश आहे. उपप्रादेशिक कार्यालय, राजुर अंर्तगत अकोले तालुका महामंडळाचे उपप्रादेशिक कार्यालय राजुर, खिरविरे अंतर्गत गोदामाचे नाव देवगाव खिरविरे, गोदामाचे ठिकाण देवगाव खिरविरे अंतर्गत खिरविरे, एकदरे, जमानावाडी, पिंपळदरवाडी, बतिाका, चंदगीरवाडी, सांगवी, पाडोशी, कोकणवाडी, तिरडे, पाचपट्टा, शिवाजीनगर, पेढेवाडी, म्हाळुंगी व तालुक्यातील आदिवासी क्षेत्रातील इतर धान लागवड असलेली सर्व महसूली गावाचा समावेश आहे.

Advertisement

कृषी अधिकारी अहमदनगर यांनी त्यांच्याकडील 1 डिसेंबर, 2021 च्या पत्रान्वये खरीप पणन हंगाम 2021-22 मध्ये अकोले तालुक्यामधील पिक पेरणी अहवाल प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित, नाशिक, प्रादेशिक कार्यालय, जुन्नर यांच्या मागणीप्रमाणे सादर केलेला आहे. त्यानुसार धान या पिकाखालील खरीप हंगाम 2021-22 मधे अहमदनगर जिल्ह्याकरिता पिक पेरणी क्षेत्र 18 हजार  367 हेक्टर असल्याचे कळविले आहे. त्याअर्थी, अहमदनगर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना धान खरेदी व आधारभूत किंमत एफएक्यू गुणवत्ता साधारण दर्जा रक्कम रुपये 1 हजार 940 व एफएक्यू गुणवत्ता “अ” दर्जा रक्कम रुपये 1 हजार 960 या किमान आधारभूत किमतीचा लाभ मिळावा याकरिता, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित, नाशिक, प्रादेशिक कार्यालय, जुन्नर, जि. पुणे यांनी प्रस्तावित केल्याप्रमाणे मुक्त खरेदी केंद्र उघडण्यास मंजुरी देत आहे. महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्याकडील 30 सप्टेंबर, 2019 च्या शासन निर्णय व त्यासोबतच्या सहपत्रात नमूद केल्याप्रमाणे अभिकर्ता संस्थेने धान्य खरेदीची प्रक्रिया पार पाडावी. शासन निर्णयातील अटी व शर्ती याची काटेकोरपणे अंमलबजावणी संबधितांनी करण्यात यावी, असे जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी आदेशित केले आहे. सर्व संबधितांनी याची नोंद घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी, अहमदनगर यांनी प्रसिध्दीपत्राद्वारे केले आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply