Take a fresh look at your lifestyle.

करोनाला हरवण्यासाठी नगर झालेय सज्ज; पहा काय आहे प्रशासकीय तयारी

अहमदनगर : कोरोनाशी लढा देण्याकरिता डॉक्टरांनी पुढाकार घेऊन उभारलेल्या ऑक्सिजन प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्हा ऑक्सिजनबाबत स्वयंपुर्ण झाला आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला होता. ऑक्सिजनसाठी मोठी कसरत करावी लागली. भविष्यातील धोका व गरज ओळखून हा प्रकल्प रुग्णांसाठी आधार व राज्यासाठी पथदर्शी ठरणार असल्याची भावना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी व्यक्त केली.

Advertisement

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत निर्माण झालेला ऑक्सिजनचा तुटवडा व भविष्यातील गरज ओळखून इंडियन मेडिकल असोसिएशन अहमदनगर व शहरातील साईदीप, श्रीदीप, न्यूक्लियस, मॅक केअर आणि स्वास्थ्य या हॉस्पिटलने एकत्र येऊन एमआयडीसी येथे स्वामी एअर प्रॉडक्ट्स या नावाने जिल्ह्यातील सर्वात मोठा ऑक्सिजन प्रकल्प कार्यान्वीत केला आहे. या प्रकल्पाचा शुभारंभ जिल्हाधिकारी भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार संग्राम जगताप, मनपा आयुक्त शंकर गोरे, मराठा चेंबर्सचे चेअरमन अरविंद पारगावकर, आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनिल आठरे, डॉ.एस.एस.दीपक, प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के, हरजितसिंह वधवा, नगरसेवक बाळासाहेब पवार, विनीत पाऊलबुध्दे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

Advertisement

पुढे बोलताना जिल्हाधिकारी भोसले यांनी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत ऑक्सिजन अभावी कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. यामध्ये डॉक्टर, लोकप्रतिनिधी व आयएमएचे मोठे सहकार्य लाभले. भविष्यात कोरोनाचा कुठल्याही प्रकारचा धोका न पत्कारता ऑक्सिनबाबत जिल्हा स्वयंपुर्ण बनला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासन उपाययोजना करीत असून, कोरोना चाचणी व लसीकरण वाढविण्याचे त्यांनी आवाहन केले. तर दुसर्‍या लाटेत ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे आलेले कटू अनुभव व डॉक्टरांशी उडालेले खटके त्यांनी विशद केले. प्रास्तविक डॉ. सतीश सोनवणे यांनी कोरोनाच्या रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची आवश्यकता भासत असताना डॉक्टरांसह अनेकांच्या हृदयाचे ठोके चुकले होते. शहरातील डॉक्टरांनी एकत्र येऊन जिल्ह्याला ऑक्सिजनसाठी स्वयंपुर्ण बनविले असल्याचे त्यांनी सांगितले. उपस्थित पाहुण्यांनी ऑक्सिजन प्रकल्पाची पहाणी केली.

Advertisement

आयुक्त शंकर गोरे म्हणाले की, कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत ऑक्सिजनचे महत्त्व सर्वांना पटले. भविष्यात पुन्हा हा धोका उद्भवू नये म्हणून हा प्रकल्प महत्त्वपुर्ण भूमिका बजावणार आहे. शहरात कोरोनाचे रुग्ण सापडत असले तरी, परिस्थिती आशादायक आहे. शंभर पैकी दोनच रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत असल्याचे त्यांनी सांगितले. अरविंद पारगावकर यांनी शहरात ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाल्यानंतर सर्व डॉक्टर मंडळींनी एमआयडीसीमध्ये ऑक्सिजनचे सिलेंडर गोळा करुन अनेक रुग्णांचे प्राण वाचवले. ऑक्सिजन निर्मितीसाठी उद्योजकांपेक्षा डॉक्टरांनी पुढाकार घेतला ही कौतुकास्पद बाब असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. अनिल आठरे यांनी आयएमए ने सामाजिक योगदानाच्या भावनेने हा प्रकल्प उभा केला आहे. डॉक्टरांना रुग्णसेवेसाठी नेहमीच पाठबळ राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आमदार संग्राम जगताप म्हणाले की, शहरात डॉक्टरांनी उभा केलेला ऑक्सिजनचा प्रकल्प राज्यासह देशाला दिशा देणारा ठरणार आहे. इतर जिल्ह्यातही याचे अनुकरण होणार आहे. मध्यवर्ती असलेल्या अहमदनगर शहरात रुग्णालयात इतर जिल्ह्यातील तालुक्यांचा देखील ताण असतो. दुसर्‍या लाटेत डॉक्टर मंडळी हॉस्पिटल सोडून ऑक्सिजनसाठी धावपळ करीत होते. डॉक्टरांनी काळाची गरज ओळखून उभारलेला प्रकल्प नागरिकांसाठी संजीवनी ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. अमित बडवे, डॉ. सचिन वहाडणे, डॉ. आनंद काशिद, डॉ. सचिन घुले, डॉ. गोपाळ बहरुपी, डॉ. अभिजीत शिंदे, डॉ. विजय निकम, डॉ. किरण दीपक, ओमकार तांबोळी, डॉ. मोहंमद माजीद, आनंद बोरा, जस्मित वधवा, राकेश गांधी, सुधीर लांडगे, प्रशांत मुनोत, डॉ. रेणुका पाठक, डॉ. वारे, डॉ. सतीश सुपेकर, डॉ. गणेश झरेकर, सागर निंबाळकर, सीए पराग मुथा, दर्शन सोनी, मनोज देशमुख आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरजितसिंह वधवा यांनी केले. आभार डॉ. अभिजित पाठक यांनी मानले.

Advertisement
Advertisement

Leave a Reply