अहमदनगर : हिवाळ्याच्या दिवसात सकाळच्या चहा बरोबर काहीतरी मसालेदार नाश्ता खाण्याचा ट्रेंड वाढत आहे. तसेही सकाळी घरातून बाहेर पडताना पोटभर नाश्ता केला असेल तर दिवसही चांगला जातो. फार भूक लागत नाही. त्यामुळे नाश्त्यात नेहमीच पौष्टिक आणि तितकेच स्वादिष्ट पदार्थ असावेत, यावर प्रत्येकाचा भर असतो. पोहे, उपमा, इडली सांबर यांसारखे पदार्थ नाश्त्यात जास्त पसंत केले जातात.
यापेक्षा जर काहीतरी वेगळे तयार करायचे असेल तर तुम्ही तीळ आणि वाटाण्याचा थेपला ट्राय करू शकता. हा थेपला आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच स्वादिष्टही आहे. आणि विशेष म्हणजे, थेपला तयार करण्यासाठी फार वेळही लागत नाही. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात काहीतरी वेगळे पाहिजे असेल तर तीळ वाटाण्याचा थेपला बेस्ट पर्याय ठरेल. आज आपण हा थेपला कसा तयार करतात, याची माहिती घेऊ या..
साहित्य
उकडलेले वाटाणे 1 वाटी, धुतलेले तीळ 1 कप, मल्टीग्रेन मैदा 2 वाट्या, बारीक चिरलेला कांदा 1 चमचा, बारीक चिरलेले अद्रक 1 चमचा, चिरलेली हिरवी मिरची 1 चमचा, बारीक चिरलेली कोथिंबीर 1 चमचा, मीठ चवीनुसार, कैरी पावडर 1 चमचा, ओवा अर्धा चमचा, जिरे अर्धा चमचा आणि रिफाइंड तेल.
रेसिपी
सर्व प्रथम उकडलेले वाटाणे मॅश करा. मॅश केलेल्या मटारमध्ये कैरी पावडर, बारीक चिरलेला कांदा, धणे, अद्रक, हिरवी मिरची, ओवा, जिरे आणि मीठ टाकून मऊ पीठ तयार करुन घ्या. नंतर तयार पिठाचे गोळे बनवा. प्रत्येक गोळा तिळात टाकून लाटून घ्या. गरम तव्यावर ठेवा. दोन्ही बाजूंनी तेल टाका. त्यानंतर गरमागरम तीळ-वाटाणा थेपला तयार आहेत, तुम्ही हिरवी चटणी, दह्याबरोबर सर्व्ह करू शकता.
नाश्त्यासाठी तयार करा स्पेशल गुजराती स्टाइल मेथी थेपला; ही आहे सोपी रेसिपी..