Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘त्यासाठी’ पीकपद्धतीमध्ये बदलाची गरज; पहा पांढरपट्टे यांनी नेमके काय म्हटलेय

अहमदनगर : राज्य सरकारच्या रोजगार हमी योजना, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव दिलीपराव पांढरपट्टे यांनी नुकतीच दिनांक १३ जानेवारी २०२२ रोजी आदर्शगाव हिवरे बाजारला भेट दिली आणि पद्मश्री पोपटराव पवार यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांच्यासमवेत मनोज ढोकचौळे (जिल्हा जलसंधारण अधिकारी तथा कार्यकारी अभियंता मृद व जलसंधारण जिल्हा परिषद, अहमदनगर), चंद्रकांत मुळे (उपविभागीय जलसंधारण अधिकारी), ऋषिकेश चव्हाण (शाखा अभियंता), पोपटराव नवले (तालुका कृषी अधिकारी, अहमदनगर), शंकर खाडे (कृषी पर्येवेक्षक) आदि उपस्थित होते.

Loading...
Advertisement

पांढरपट्टे पुढे बोलताना म्हणाले, जागतिक तापमानवाढ, अवेळी पाऊस याचा विपरीत परिणाम पिक पद्धतीवर होत असून त्यावर मात करण्यासाठी आदर्श गाव हिवरे बाजार येथील पिक व पाणी व्यवस्थापन अतिशय महत्वाचे ठरणार आहे. गेल्या ३० वर्षापूर्वी हिवरे बाजार येथे पिक व पाण्याचे योग्य नियोजन असल्यामुळे इतर गावांनी हिवरे बाजारचा आदर्श घ्यावा जेणेकरून तापमान बदलातही आपल्याला उत्तम नियोजन करता येईल. हिवरे बाजार मधील पिक नियोजनामुळे आज फळबाग व दुध उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. हिवरे बाजार येथील ग्रामसंसद, ग्रामदर्शन, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र तसेच गावामध्ये झालेल्या वनसंवर्धन, मृदसंधारण  व जलसंधारण कामाची  पाहणी करून पद्मश्री पोपटराव पवार यांनी सविस्तर माहिती दिली. महाराष्ट्र शासनाच्या आदर्श गाव योजनेअंतर्गत हिवरे बाजार येथे प्रगतीपथावर असलेल्या यशवंतराव चव्हाण एकात्मिक ग्रामीण विकास प्रशिक्षण केंद्रास भेट दिली आणि इमारतीच्या बांधकामाचा आढावा घेतला.

Advertisement
Advertisement

Leave a Reply