Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

वेगळे काहीतरी.. घरीच तयार करा मका आणि तिळाची टिक्की; माहित करुन घ्या सोपी रेसिपी

अहमदनगर : मकर संक्रांतीचा सण शुक्रवारी देशभरात साजरा होणार आहे. नव्या वर्षातील हा पहिलाच सण आहे. त्यामुळे या सणानिमित्त काहीतरी स्पेशल खाद्यपदार्थ तयार करण्याची इच्छा असते. अशा वेळी तुम्हाला काहीतरी स्पेशल आणि स्वादिष्ट खाद्य पदार्थ तयार करायचा असेल तर तुम्ही मका आणि तिळाची मसालेदार टिक्की तयार करू शकता. ही टिक्की चवीलाही चांगली आहे. तसेच तयार करण्यासाठीही फार वेळ लागत नाही. या मकर संक्रांतीत तुम्ही ही वेगळी रेसिपी नक्की करून पाहू शकता. चला तर मग, मक्याचे पीठ आणि तिळाची टिक्की कशी तयार करायची ते जाणून घेऊ या..

Advertisement

साहित्य
2 कप कॉर्न फ्लोअर (मका पीठ), अर्धा कप गूळ, 1/4 कप पाणी, 1/4 कप तीळ, आवश्यकतेनुसार पाणी, तळण्यासाठी तेल.

Loading...
Advertisement

रेसिपी
सर्व प्रथम एका भांड्यात कॉर्न फ्लोअर चाळून घ्या. मंद आचेवर कढईत गूळ आणि पाणी टाका. उकळी आल्यावर गॅस बंद करा. आता मक्याच्या पिठात तीळ, तेल टाकून गुळाच्या पाण्याच्या मदतीने पीठ तयार करून घ्या. पीठ तयार करताना पाण्याची गरज भासल्यास थोडे-थोडे पाणी टाकू शकता. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तिळाचे प्रमाण वाढवू किंवा कमी करू शकता. नंतर पिठाचे छोटे गोळे तोडून तळहातावर ठेवून सपाट करा. कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यावर त्यात टिक्की टाका आणि दोन्ही बाजूंनी सोनेरी तपकिरी रंग येईपर्यंत तळून घ्या. मका आणि तिळाची टिक्की तयार आहे. हवा बंद डब्यात ठेवून तुम्ही ते साठवू शकता.

Advertisement

हिवाळ्यात घरीच तयार करा स्पेशल आलू टिक्की; ‘ही’ आहे अगदी सोपी रेसिपी..

Advertisement
Advertisement

Leave a Reply