Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

नाश्त्यासाठी तयार करा स्पेशल गुजराती स्टाइल मेथी थेपला; ही आहे सोपी रेसिपी..

अहमदनगर : हिवाळ्याच्या दिवसात सकाळच्या चहा बरोबर काहीतरी मसालेदार नाश्ता खाण्याचा ट्रेंड वाढत आहे. तसेही सकाळी घरातून बाहेर पडताना पोटभर नाश्ता केला असेल तर दिवसही चांगला जातो. फार भूक लागत नाही. त्यामुळे नाश्त्यात नेहमीच पौष्टिक आणि तितकेच स्वादिष्ट पदार्थ असावेत, याकडे भर असतो. पोहे, उपमा, इडली सांबर यांसारखे पदार्थ नाश्त्यात जास्त पसंत केले जातात. यापेक्षा जर काहीतरी वेगळे तयार करायचे असेल तर तुम्ही गुजराती स्टाइल मेथी थेपला तयार करू शकता.

Advertisement

गुजरातचे अनेक खाद्यपदार्थ त्यांच्या चवीमुळे देशभर प्रसिद्ध झाले आहेत. ढोकळा असो, फाफडा असो की मेथी थेपला. ताज्या मेथीची पाने टाकून तयार केला जाणारा थेपला स्वादिष्ट तर असतोच शिवाय आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतो. त्यामुळे हा गुजरात स्टाइल मेथी थेपला जर तुम्हाला घरीच तयार करायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला रेसिपी सांगणार आहोत. मेथी थेपला हा एक असा खाद्य पदार्थ आहे जो सकाळचा नाश्ता, दुपार आणि संध्याकाळच्या आहारातही त्याचा समावेश करू शकता.

Advertisement

साहित्य
गव्हाचे पीठ 2 कप, मेथीची पाने 1 कप, दही अर्धा कप, बेसन 1/4 कप, तीळ 1 चमचा, ओवा अर्धा चमचा, थोडे किसलेले अद्रक, काश्मिरी लाल मिरची अर्धा चमचा, हळद 1/4 चमचा, तेल, चिरलेली हिरवी मिरची.

Loading...
Advertisement

रेसिपी
मेथी थेपला बनवण्यासाठी प्रथम एका मोठ्या भांड्यात 2 कप गव्हाचे पीठ टाका. त्यात बेसन टाका. आता दोन्ही चांगले मिसळा. आता त्यात लाल तिखट, ओवा, तीळ, हळद आणि चवीनुसार मीठ टाकून मिसळून घ्या. यानंतर त्यात चिरलेली हिरवी मिरची आणि किसलेले अद्रक टाकून पुन्हा मिसळून घ्या. मेथीची पाने नीट स्वच्छ करुन बारीक चिरून घ्या. आता ही पाने पीठाच्या मिश्रणात टाका. लक्षात ठेवा की मेथीची पाने पिठात चांगली मिसळली पाहिजेत. आता या मिश्रणात अर्धा कप दही टाका. दही वापरल्याने थेपल्यात येणारा कडूपणा नाहीसा होतो. याबरोबरच थेपल्यांची चवही वाढते. आता थोडे थोडे पाणी टाकून पीठ तयार करुन घ्या. वाटल्यास दह्याचे पाणीही टाकू शकता. पीठ मऊ करुन घ्या म्हणजे थेपला सहज बनवता येतील. पीठ मऊ करण्यासाठी तुम्ही 2 चमचे तेलही घालू शकता.

Advertisement

पीठ तयार झाल्यावर त्याचे गोळे करून चपाती किंवा पराठ्याप्रमाणे लाटून घ्या. आता तवा गॅसवर ठेवून त्यावर थेपला टाका. आता थेपला दोन्ही बाजूंनी पराठ्याप्रमाणे भाजून त्यात तेल किंवा तूप लावा. अशा प्रकारे सर्व थेपले तयार करा. तुमचा स्वादिष्ट मेथी थेपला तयार आहे. हे दही किंवा लोणच्याबरोबर सर्व्ह करता येते.

Advertisement

हिवाळ्यात घरीच बनवा हॉटेलसारखी टेस्टी पावभाजी; ‘ही’ आहे अगदी सोपी रेसिपी..

Advertisement
Advertisement

Leave a Reply