Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

मकर संक्रांतीनिमित्त तयार करा खास बंगाली स्टाइल खिचडी; जाणून घ्या, अगदी सोपी रेसिपी..

अहमदनगर : मकर संक्रांतीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यंदा हा सण 14 जानेवारीला साजरा होणार आहे. मकर संक्रांतीला खिचडीचे वेगळेच महत्व आहे. या सणाच्या दिवशी घरात खिचडी असतेच. हा सण संपूर्ण देशात साजरा केला जातो. त्यामुळे प्रत्येक प्रांतात खिचडी अनेक पद्धतीने तयार केली जाते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही यावर्षी खिचडी बनवण्याची नवीन रेसिपी शोधत असाल, तर जाणून घेऊया खास बंगाली स्टाइल खिचडी कशी तयार करतात. ही रेसिपी खूप सोपी आहे आणि खिचडीही अगदी कमी वेळात तयार होते.

Advertisement

साहित्य
250 ग्रॅम बासमती तांदूळ, 2 मध्यम आकाराचे बटाटे, 100 ग्रॅम मूग डाळ, फुलकोबी (लहान आकाराचे),100 ग्रॅम वाटाणे, खिचडी साठी मसाला, थोडे अद्रक, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा हळद, थोडी साखर, 2 लाल मिरच्या, अर्धा चमचा जिरे, चिमूटभर हिंग, दालचिनी, 2-3 तमालपत्र, 3 लवंग, 2 लहान वेलची, 1 चमचा गावरान तूप, चवीनुसार मीठ, 1 चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर.

Advertisement

रेसिपी
सर्व प्रथम तांदूळ पाण्याने नीट स्वच्छ करा. आता बटाटे सोलून त्याचे तुकडे करा आणि फुलकोबीचेही मोठे तुकडे करा. अद्रक किसून घ्या आणि हिरव्या मिरच्या चिरून ठेवा. आता गॅसवर कढई गरम करून त्यात मूग डाळ मंद आचेवर गुलाबी होईपर्यंत भाजून घ्या. आता त्यामध्ये तूप, तांदूळ, लाल मिरची, जिरे आणि हिंग वगळता सर्व साहित्य मिसळून मंद आचेवर अर्धा लिटर गरम पाण्यात झाकण ठेवून शिजू द्या.

Loading...
Advertisement

डाळ आणि तांदूळ शिजल्यानंतर गॅस बंद करा. खिचडी सर्व्ह करण्यापूर्वी एका वेगळ्या भांड्यात तूप गरम करून त्यात लाल तिखट, जिरे आणि हिंग टाका. ही फोडणी खिचडीमध्ये टाकू चांगले मिसळा. त्यानंतर कोथिंबीर टाका. मसालेदार खिचडी टोमॅटो कोथिंबीर चटणी आणि पापड सोबत सर्व्ह करा.

Advertisement

मकर संक्रांत स्पेशल : घरीच तयार कार मूग डाळीची मसाला खिचडी; ही आहे रेसिपी..

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply