Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘वर्क फ्रॉम होम’ मुळे वजन वाढतेय..? मग, ‘या’ सवयी टाळा आणि आरोग्याचीही घ्या काळजी..

अहमदनगर : कोरोनाच्या संकटात अनेक कंपन्यांनी त्यांच्या कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वर्क फ्रॉम होम सुरू केले आहे. घरून काम करण्याचे काही फायदे आहेत आणि काही नुकसावनही. नुकसानीबद्दल विचार केला तर त्यामुळे लोकांची जीवनशैली बदलत चालली आहे. शारीरिक हालचाल कमी झाली आहे आणि त्यामुळे अनेक रोगांना आमंत्रण मिळत आहे. या आजारांमध्ये थायरॉईड, मधुमेह असे काही आजारांचा समावेश आहे. या आजारांव्यतिरिक्त, एक अतिशय सामान्य आजार आहे जो या कारणामुळे बहुतेक लोकांच्या त्रासाचे कारण ठरत आहे.

Advertisement

वर्क फ्रॉम होममुळे कामकाजात बदल झाला आहे. तासनतास एकाच जागी बसल्याने वजन वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. सध्या अनेक जण या समस्येचा सामना करत आहेत. वजन वाढल्यानंतर लोकांना गुडघेदुखीचाही त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे वर्क फ्रॉम होम दरम्यान काही महत्वाच्या गोष्टींचे पालन केले तर तुम्ही वाढते वजन आणि अन्य त्रासांना दूर ठेऊ शकाल.

Advertisement

सर्व प्रकारच्या आजारांपासून मुक्ती मिळवण्यासाठी पाणी गुणकारी मानले जाते. जे लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात त्यांनाही अधिकाधिक पाणी पिण्यास सांगितले जाते. तथापि, असे दिसून आले आहे की घरातून काम करताना लोक कामात इतके व्यस्त असतात की त्यांना पाणी पिण्याची देखील आठवण राहत नाही. पाणी कमी प्यायल्यास वजन वाढते.

Loading...
Advertisement

वर्क फ्रॉम होम दरम्यान तासनतास एकाच जागी बसल्याने आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होण्याचा धोका असतो. पाठदुखी, मानदुखी असे त्रास होण्याची शक्यता वाढते. सारखे लॅपटॉप किंवा स्मार्टफोन वापरत असल्याने डोळ्यांनाही त्रास होतो. अशा परिस्थितीत तज्ज्ञांच्या मते, मध्येच काही वेळ ब्रेक घ्यावा, ज्यामुळे शरीराची हालचाल होते.

Advertisement

असे देखील दिसून आले आहे की बहुतेक भोजन करतात आणि लगेच ऑफीसच्या कामकाजास सुरुवात करतात. तुम्हीही जर असे करत असाल तर ही सवय बंद करा. काही खाल्ल्यानंतर किमान दहा मिनिटे तरी चालायला हवे. असे दर केले नाही तर खाल्लेले अन्न शरीराला फायदा होण्याऐवजी नुकसान देऊ शकते. यामुळे वजन वाढेल याची जाणीव असतानाही याकडे दुर्लक्ष केल्याचे परिणाम म्हणून वजन वाढते.

Advertisement

ओमिक्रॉनची भीती : इतके टक्के कर्मचारी म्हणतात आपले ‘वर्क फ्रॉम होम’च बरे

Advertisement
Advertisement

Leave a Reply