Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Election 2022 : लागा तयारीला.. आणि मग महापालिका-झेडपीच्या निवडणुकीसाठी होणार मोकळे आकाश..!

पुणे : राज्यातील १४ महापालिका व २६ जिल्हा परिषदांच्या सार्वत्रिक निवडणुका येत्या मार्चअखेर पार पडण्याची चिन्हे असल्याने अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून तयारी सुरू केली आहे. याप्रकरणी १७ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयातील सुनवणीनंतर राज्य निवडणूक आयोग यावर भूमिका स्पष्ट करेल असे म्हटले जात आहे. यामुळे मार्च महिन्यात या निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसोबतच मुंबई महापालिकेच्या निवडणुका घेण्यासाठी मुंबई महापालिका आणि राज्यातील सत्ताधारी शिवसेना तयार असल्याचे म्हटले जात आहे.

Advertisement

२०१७ मध्ये राज्यात महापालिका आणि जिल्हा परिषदांसाठी १६ फेब्रुवारी रोजी मतदान झाल्याचे लक्षात घेऊन अनेकांनी नियोजन केले होते. दरम्यान, ओबीसी आरक्षण पूर्ववत करण्यासाठी राज्य सरकारने तीन महिने निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केल्याने अनेकांचा भ्रमनिरास झाला आहे. सध्या प्रभाग रचनेचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून ज्या सुधारणा सुचवल्या आहेत त्या पुढच्या आठवड्यापर्यंत पूर्ण होतील. नंतर हरकती मागवल्या जाणार आहेत. तरीही १७ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयातील ओबीसी आरक्षण सुनावणीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Loading...
Advertisement

मात्र, संविधानिक नियमानुसार निवडणुका अशा कारणाने पुढे ढकलणे शक्य नाही. त्यामुळे मार्च महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. १० फेब्रुवारी ते ७ मार्चदरम्यान उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका आहेत. यादरम्यान मुंबई महापालिकेच्या निवडणुका व्हाव्यात अशी शिवसेनेची आग्रही भूमिका आहे. मुंबईतील उत्तर भारतीय मतदार मोठ्या संख्येने गावी गेल्यावर इकडे निवडणूक झाल्यास भाजपला फटका बसण्याची शक्यता लक्षात घेऊन अशी व्यूहरचना केली जात आहे.

Advertisement

Advertisement

Leave a Reply