अहमदनगर : हिवाळ्यात वाटाणा मुबलक प्रमाणात असतो. तसेच, त्याची वाटाणा स्वादिष्ट सुद्धा आहे. आरोग्यासाठीही खूप फायदेशीर ठरतो. त्यात जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर यांसारख्या आवश्यक पोषक तत्वांचा समावेश असतो. वाटाण्यामध्ये काही जीवनसत्वेही असतात. तसेच यामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म भरपूर असतात. वाटाण्यापासून अनेक रेसिपी तयार करता येतात. त्यातील काही रेसिपीबद्दल माहिती घेऊ या, या रेसिपीमुळे तुम्ही हे खाद्यपदार्थ घरी अगदी सहज तयार करू शकता.
वाटाणा कचोरी
वाटाणा कचोरी बनवण्यासाठी एका भांड्यात मैदा आणि पीठ चाळून घ्या. दोन चमचे तेल आणि चवीनुसार मीठ टाकून चांगले मिसळून घ्या. त्यानंतर थोडे कोमट पाणी टाकून मऊ पीठ तयार करा. साधारण 20 ते 30 मिनिटे पीठ झाकून ठेवा. यानंतर सारण तयार करण्यासाठी पाणी गरम करून त्यात वाटाणे घालून चांगले उकळून घ्या. वाटाणे 5-6 मिनिटांत चांगले उकळतील. यानंतर गॅस बंद केल्यानंतर वाटाण्यामधील सर्व पाणी काढून मिक्सरमध्ये अद्रक आणि हिरवी मिरची टाकून मिक्समध्ये फिरवून घ्या. फक्त हे मिश्रण बारीक होणार नाही, याची काळजी घ्या. आता एका कढईत तेल गरम करा, त्यात हिंग टाकून तयार केलेली वाटाणा पेस्ट टाका आणि वरून मीठ टाकून चांगले मिसळा. साधारण पाच मिनिटे मध्यम आचेवर तळून घ्या आणि गॅस बंद करा. थंड झाल्यावर कचोऱ्या बनवा.
पराठे
वाटाणे टाकून स्वादिष्ट पराठे बनवू शकता. जर तुम्हाला पराठे पसंत असतील तर तुम्ही नाश्त्यासाठी वाटाण्याचे पराठे बनवू शकता. ते बनवण्यासाठी वाटाणे मऊ होईपर्यंत उकळून घ्या आणि पाणी काढून टाका. गार झाल्यानंतर बारीक वाटून घ्या. आता हिरव्या मिरच्या बारीक करा आणि अद्रक सोलून किसून घ्या. वाटलेल्या वाटाण्यामध्ये मीठ, हिरवी मिरची, अद्रक, लाल तिखट, धनेपूड, कैरी आणि कोथिंबीर टाकून चांगले मिसळून घ्या. आता या तयार सारणातून पराठे बनवा.
मटर पनीर
वाटाण्याची चवदार भाजी बनवू शकता. मटर पनीर हे लहान मुलांबरोबरच मोठ्यांनाही आवडते. मटर पनीर बनवण्यासाठी तुम्हाला फक्त मटार उकळावे लागतील. नंतर थोडे टोमॅटो आणि काजू वेगवेगळे बारीक करून घ्या. नंतर कढईत तूप गरम करून त्यात जिरे तडतडून त्यात टोमॅटोची पेस्ट टाका. नंतर त्यात धने पावडर, हळद, लाल तिखट आणि मटर पनीर मसाला चांगले मिसळा. आता त्यात काजूची प्युरी टाका आणि थोडी साखर मिसळा, नंतर शिजू द्या. आवश्यकतेनुसार पाणी टाका आणि नंतर वाटाणे आणि पनीर टाका. आता त्यात गरम मसाला टाकून मिसळून घ्या. स्वादिष्ट मटर पनीर तयार आहे.
आजची रेसिपी : घरी तयार करा टेस्टी आणि हेल्दी टोमॅटो सूप; जाणून घ्या, सोपी रेसिपी..