अहमदनगर : आपल्याकडे काही समारंभ किंवा काही कार्यक्रम असेल तर काहीतरी स्पेशल तयार केले जाते. यासाठी विविध खाद्यपदार्थ आहेत. जे स्वादिष्टही असतात, आणि तयार करायलाही सोपे असतात. नाश्त्यातही बऱ्याचदा असे पदार्थ दिसतात. आता तुम्हाला तेच एकसारखे पदार्थ तयार करायचे नसतील आणि काहीतरी वेगळे करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी काही खास पदार्थ आहेत. तुम्ही यावेळी तंदूरी कोबी टिक्का हा पदार्थ तयार करू शकता. हा नवीन पदार्थ तयार करायला फार अवघड नाही. चला तर मग, जाणून घेऊ काय आहे तंदूर कोबी टिक्का तयार करण्याची रेसिपी.
साहित्य- फुलकोबी (फ्लॉवर) 1, घट्ट दही 1 कप, लाल तिखट अर्धा चमचा, गरम मसाला पावडर 1 चमचा, चाट मसाला पावडर 1 चमचा, हळद पावडर अर्धा चमचा, धने पावडर 1 चमचा, ओवा अर्धा चमचा, कसुरी मेथी 1 चमचा, बेसन 3 चमचे, तेल – आवश्यकतेनुसार, मीठ – चवीनुसार.
रेसिपी
आधी फुलकोबी (फ्लॉवर) पाण्याने स्वच्छ करुन चार ते पाच मिनिटे वाफेवर शिजू द्या. कोबी वाफेवर शिजल्यानंतर त्यात सर्व मसाले चांगले मिसळले जातात. आता एका मोठ्या भांड्यात कोबी काढून घ्या. तेल सोडून इतर सर्व साहित्य घालून हलक्या हाताने मिसळून घ्या. आता ते अर्धा तास झाकून ठेवा. एका कढईत तेल गरम करून त्यात कोबीचे एक एक तुकडे टाका. मध्यम आचेवर काही मिनिटे तळून घ्या.
तळलेला फ्लॉवर एका भांड्यात काढा. कोळशाचा एक छोटा तुकडा गरम करा. कोळसा लाल झाला की स्टीलच्या भांड्यात ठेवा. ही वाटी कोबी ठेवलेल्या भांड्याच्या मध्यभागी ठेवा. भांड्यात एक चमचा तूप टाका आणि एक मिनिट झाकून ठेवा. असे केल्याने कोबीच्या टिक्क्यात कोळशाचा गंध येतो. आता सर्व्हिंग प्लेटमध्ये ठेवा आणि हिरवी चटणी आणि कांद्यासह सर्व्ह करा.
आजची रेसिपी : घरी तयार करा टेस्टी आणि हेल्दी टोमॅटो सूप; जाणून घ्या, सोपी रेसिपी..