Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

नवीन वर्षानिमित्त घरीच तयार करा स्वादिष्ट केक; ‘ही’ आहे सोपी रेसिपी..

अहमदनगर : नवीन वर्ष आता सुरू झाले आहेत. नव्या वर्षानिमित्त काहीतरी स्पेशल आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थ तयार करण्याचा विचार मनात आला असेलच. तर मग नव्या वर्षाचे स्वागत म्हणून तुम्ही अगदी घरच्या घरीच स्वादिष्ट केक तयार करू शकता. हा केक तयार करण्यासही खूप सोपा आहे आणि अगदी चविष्ट सुद्धा आहे. त्यामुळे तुम्हाला जर काही विशेष प्रसंगी स्पेशल तयार करायचे असेल तर तुम्ही हा स्वादिष्ट केक तयार करू शकता. आज आपण हा केक कसा तयार करायचा, याची सोपी रेसिपी जाणून घेणार आहोत.

Advertisement

स्वादिष्ट केक साहित्य
मैदा 1.5 कप, मिल्क पावडर 1 कप, बेकिंग पावडर 1 चमचा, सोडा 1/4 चमचा, गूळ 100 ग्रॅम, फ्रेश क्रीम 3/4 कप, कोमट दूध 3/4 कप, बारीक चिरलेले काजू 1/4 कप, लिंबाचा रस 1/2 चमचा, व्हॅनिला इसेन्स 1/4 चमचा.

Loading...
Advertisement

रेसिपी
सर्वात आधी गूळ किसून घ्या आणि कोमट दुधात भिजत टाका. मैदा, दूध पावडर, बेकिंग पावडर आणि सोडा एकत्र चाळणीतून चाळून घ्या. यामुळे हे सर्व आपापसात चांगले मिसळतील. आता त्यात मलई, कोमट गुळाचे दूध घाला. व्हॅनिला इसेन्स, चिरलेला काजू आणि लिंबाचा रस मिसळा, नीट मिसळून घ्या. त्यानंतर बेकिं ट्रे घ्या आणि त्यात तेल टाका. त्यात तयार मिश्रण ओता. नंतर आधीच तयार केलेल्या ओव्हनमध्ये किंवा कुकरमध्ये ठेवा. आणि 25 ते 30 25 ते 30 मिनिटे शिजू द्या. त्यानंतर केक तयार झाला आहे किंवा नाही हे पाहून थोड्या वेळाने बाहेर काढा. त्यानंतर चवदार केक तयार आहे.

Advertisement

नववर्षानिमित्त बनवा अक्रोड आणि खजुराचा चविष्ट केक.. आरोग्यासाठीही राहिल फायदेशीर..

Advertisement
Advertisement

Leave a Reply