अहमदनगर : नवीन वर्ष सुरू होण्यास दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे अनेकांनी नववर्षाच्या सेलिब्रेशनची जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र, यंदा कोरोनाचा धोका कायम आहे. निर्बंधही आहेत. त्यामुळे घरी राहूनच सेलिब्रेशनचा प्लान अनेकांनी केला आहे. अशा वेळी लोक इंटरनेटच्या मदतीने नवीन वर्षासाठी काहीतरी खास पदार्थ आणि मिठाईबद्दल शोध घेत आहेत. तुम्हालाही नववर्षानिमित्त काही खास पदार्थ तयार करायचा असेल तर हेल्दी आणि चविष्ट अक्रोड आणि खजूर केक तयार करू शकता.
हा केक घरच्या घरी सहज तयार करता येते, तसेच अक्रोड आणि खजूर हे पदार्थ आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात, त्यामुळे तुम्ही मुलांसाठीही ते तयार करू शकता. केक तयार करण्याची रेसिपी सुद्धा खूप सोपी आहे. चला तर मग, जाणून घेऊ खजूर केक कसा तयार करायचा.
अक्रोड आणि खजूर केक साहित्य
चिरलेले खजूर, अक्रोड, कॉफी पावडर, लोणी, कंडेन्स्ड मिल्क, मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, व्हॅनिला एसेन्स, पाणी.
केक रेसिपी
सर्वप्रथम, खजूर गरम पाण्यात 30 मिनिटे भिजत ठेवा. नंतर कॉफी पावडर आणि गरम पाणी वापरून कॉफीचे मिश्रण तयार करा. एका भांड्यात बटर आणि कंडेन्स्ड मिल्क टाका. नंतर ते चांगले मिसळून घ्या. नंतर त्यात अक्रोड, खजूर, व्हॅनिला इसेन्स, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाका. आता हे कॉफी मिश्रणात टाका आणि चांगले मिसळा. बेकिंग डिश ग्रीस करुन बैटर टाका. आधी गरम केलेल्या ओव्हनमध्ये 180°C वर 50 मिनिटे किंवा मायक्रोवेव्हमध्ये 30-40 मिनिटे शिजू द्या. कढईतही तयार करू शकता. हा केक थंड झाल्यावर कट करुन सर्व्ह करा.
ख्रिसमसनिमित्त मैदा आणि गुळाचा बनवा चविष्ट केक.. चवीसोबत आरोग्याचीही घ्या काळजी