Take a fresh look at your lifestyle.

अगोदर अतिवृष्टीचे संकट.. आता नुसत्या कापूस वेचणीलाच प्रतिक्विंटल लागतात इतके पैसे.. बळीराजाही हतबल..

अहमदनगर : मागील चार ते पाच दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची खरीप हंगामातील पिके काढणीची लगबग सुरु आहे. बाजरी, उडीद, सोयाबीन काढणीसह कापूस वेचणीलाही सुरुवात झाली आहे.

Advertisement

यंदा जिल्ह्यात खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच समाधानकारक पाऊस झाला होता. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी आदी तालुक्यांमध्ये प्रामुख्याने कपाशीची लागवड झाली. यंदाही जिल्ह्यात एक लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर कापूस लागवड आहे. चांगल्या उगवणीनंतर पावसाने दडी मारली होती. मात्र अधूनमधून होणाऱ्या सरींमुळे कापूस तरला होता.

Advertisement

काही भागात पावसाअभावी कापसाची वाढही खुंटली होती. बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांना कीटकनाशके फवारणीसाठी पैसे मोजावे लागले होते. त्यातच हंगाम शेवटाकडे असताना मागील महिन्यात सलग झालेल्या पावसाने शेत उपाळून कपाशीची पानगळ होऊन झाडे जागेवर वाळून गेली. अतिवृष्टीने अनेक शेतकऱ्यांचे पीकच भुईसपाट झाले. त्यामुळे बागायतात केवळ एकरी सहा ते आठ क्विंटल, तर जिरायतात तीन ते पाच  क्विंटल एवढेच उत्पादन निघण्याची शक्यता आहे.

Advertisement

आता पावसाने उघडीप दिल्याने  सध्या जवळपास सर्वच शेतकऱ्यांची सुगीची लगबग सुरु आहे. त्यामुळे मजूर टंचाईचाही सामना करावा लागत आहे. अधिकचे पैसे मोजूनही मजूर मिळत नाही.

Advertisement

एक क्विंटलला कापूस वेचणी  लागतात एक हजार रुपये :  कापसाला एका किलोसाठी मजुरांना दहा रुपये किलोपर्यंत भाव द्यावा लागत आहे. त्यामुळे एका क्विंटलला कापूस वेचणी एक हजार रुपये केवळ मजुरीचा लागत आहे. सध्या ५ हजार ६०० ते ५ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे भाव मिळत आहे. एकरी सरासरी पाच ते आठ क्विंटल कापूस निघत आहे. विक्रीतून शेतकऱ्यांच्या हाती मिळतात २५ ते ३० हजार रुपये. मशागत, पेरणी व इतर खरच पकडला तर शेतकऱ्यांच्या हाती काहीच राहत नाही.

Advertisement

अद्याप एकही हमीभाव खरेदी केंद्र नाही : अद्याप सीसीआय किंवा पणनचे कापूस खरेदी केंद्र (हमीभाव खरेदी केंद्र) सुरू झालेले नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे अडचणीतील  शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांनाच कापूस विकावा लागत आहे. सध्या ५ हजार ६०० ते ५ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे भाव मिळत आहे. त्यामुळे कापसाचे हमीभाव खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply