Take a fresh look at your lifestyle.

मराठीच्या विद्यार्थ्यांना ‘आयडिया मॅन’ ची संधी; वृत्तपत्रीय लेखनावर ऑनलाईन कार्यशाळेत काय म्हटलेय पहा

अहमदनगर : मराठी भाषेकडे वेगळ्या नजरेने पाहण्यापेक्षा त्यातील संधी शोधल्या पाहिजेत. पत्रकारितेसह विविध क्षेत्रामध्ये मराठीच्या विद्यार्थ्यांना भरपूर संधी आहे. मराठी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असल्यास संवादी जगात तुम्ही आयडिया मॅन होऊ शकता, असे प्रतिपादन दै. लोकमतचे आवृत्तीप्रमुख सुधीर लंके यांनी केले.

Advertisement

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे संलग्न श्री बाणेश्वर शिक्षण संस्थेचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय बुर्हाणनगर (ता. जि. नगर) येथील मराठी विभागातर्फे वृत्तपत्रीय लेखन व संधी या विषयावर आयोजित ऑनलाईन कार्यशाळेत ते बीजभाषक म्हणून बोलत होते. यावेळी प्राचार्य डाॅ. एस. एस जाधव, दै. प्रभातचे निवासी संपादक विठ्ठल लांडगे, दै. सकाळचे वरिष्ठ उपसंपादक अशोक निंबाळकर, डाॅ. व्ही. एम. जाधव, मराठी विभाग प्रमुख डाॅ. बी. एम. मुळे आदी उपस्थित होते.

Advertisement

सुधीर लंके म्हणाले, की आपल्या भोवताली बातम्या असतात पण, तसा दृष्टिकोन आपल्याकडे असायला हवा. प्रत्येक व्यक्ती बातमी दार असते. पण तस प्रत्येकाने सिध्द केले पाहिजे. मराठी विषयाच्या विद्यार्थीना येणार्या काळात पत्रकारिता, डिजिटल माध्यमांमध्ये भरपूर संधी आहेत. हे जग संवादाचे आहे. त्यामुळे उत्तम संवादकाला भरपूर संधी आहेत. चांगली पुस्तके वाचा, लिहायला शिका, बोलायला शिका, चिंतन करा करून नवनवीन आयडीयाची निर्मिती करा. त्यातून तुम्हाला रोजगार उपलब्ध होईल.

Advertisement

दै. प्रभातचे निवासी संपादक विठ्ठल लांडगे म्हणाले की, मराठी भाषेच्या विद्यार्थ्यांनी वाचन आणि लेखनावर भर दिला पाहिजे. मराठीवर प्रभुत्व असणार्याना पत्रकारितेत मुद्रित माध्यमांमध्ये चांगल्या संधी आहेत. दैनिकामध्ये मुद्रितशोधक नावाचे पद आहे. ज्याचे मराठी व्याकरण पक्के आहे त्याला लगेच संधी मिळते. त्याचबरोबर बातमीदार, उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक आदी पदांवर काम करण्याची संधी मिळू शकते. अनेक संस्थाना आज कंटेनरायटरचे पद भरायचे आहे. पण तशी दर्जेदार माणसं मिळत नाही. त्यामुळे भाषेवर प्रभुत्व मिळवा. तुम्हाला संधी मिळेल.

Advertisement

दै. सकाळचे वरिष्ठ उपसंपादक अशोक निंबाळकर म्हणाले की, मुद्रित माध्यमाबरोबर नव्याने आलेल्या न्यू मिडीया (डिजिटल) मराठीच्या विद्यार्थ्यांसाठी एक नवी पर्वणीच घेऊन आला आहे. उत्कृष्ट लेखन कौशल्य आणि संवाद कौशल्य हे सततच्या वाचनाने, लेखानाने व सरावाने निर्माण होत असते. फेसबूक, न्यूज पोर्टल, ब्लॉग लेखनासाठी अनेक संधी आहेत, असे सांगून विद्याथ्यांना नव माध्यमांची ओळख करू दिली.  या कार्यशाळेसाठी   काॅम्प्युटर सायन्स विभागप्रमुख प्रा. वर्षा काळे यांनी विशेष सहकार्य केले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत प्राचार्य डाॅ. एस. एस जाधव यांनी केले. प्रास्ताविक व आभार डाॅ. बी. एम. मुळे यांनी मानले.

Advertisement
Advertisement

Leave a Reply