Take a fresh look at your lifestyle.

चक्क काँग्रेसने घातले भाजपासमोर लोटांगण…राज्यात राजकीय खळबळ….वाचा नेमकं काय घडलंय…

कोरोनाच्या काळात देशातील मृत्यूच्या तांडवाला, कोरोना लसीकरणाच्या धीम्या गतीला नरेंद्र मोदी जबाबदार असल्याची टीका केली जात आहे. तर कोरोनाच्या संकटाने देशाच्या वरिष्ठ सभागृहातील अनेक सदस्यांना जीव गमवावा लागला. त्यामध्ये महाराष्ट्रातील काँग्रेस नेते राजीव सातव यांचा सामावेश होतो. 

मुंबई : देशाच्या राजकारणात भाजपा आणि काँग्रेस यांना कट्टर विरोधी पक्ष मानले जातात. मात्र भाजपा आणि काँग्रेस यांच्या विचारधारा प्रचंड वेगळ्या आहेत. त्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी भाजपावर टीकेची एकही संधी सोडत नाहीत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून भाजपाच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत सगळे काँग्रेसवर तुटून पडताना दिसतात. त्यामुळे भाजपा आणि काँग्रेस कधीही एकत्र येऊ शकत नाही अशी कायम अटकळ बांधली जाते. मात्र आता या सगळ्याला छेद देत काँग्रेसने भाजपासमोर चक्क लोटांगण घातले आहे.

Advertisement

कोरोनाच्या काळात देशातील मृत्यूच्या तांडवाला, कोरोना लसीकरणाच्या धीम्या गतीला नरेंद्र मोदी जबाबदार असल्याची टीका केली जात आहे. तर कोरोनाच्या संकटाने देशाच्या वरिष्ठ सभागृहातील अनेक सदस्यांना जीव गमवावा लागला. त्यामध्ये महाराष्ट्रातील काँग्रेस नेते राजीव सातव यांचा सामावेश होतो.

Advertisement

हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांच्या निधनाने सर्वपक्षीय नेते हळहळले. मात्र त्यानंतर त्यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी राज्यसभेची निवडणूक जाहीर झाली. मात्र ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसने मोर्चेबांधणी सुरू केली. तर भाजपाने या जागेसाठी संजय उपाध्याय यांचा अर्ज भरला आहे. तर काँग्रेसने रजनी पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

Advertisement

एखाद्या नेत्याच्या मृत्यूनंतर रिक्त झालेली जागा बिनविरोध करण्याची परंपरा आहे. मात्र भाजपाने या रिक्त झालेल्या जागेवर संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेसचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे या पार्श्वभुमीवर भाजपाचा कट्टर विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने भाजपासमोर लोटांगण घातले आहे. तर संजय उपाध्याय यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या सागर निवासस्थानी भेट घेतली. त्यामुळे महाविकास आघाडीत धुसफुस वाढली आहे. तसेच काँग्रेसने भाजपासमोर लोटांगण घातल्याची भावना शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये निर्माण झाली आहे. तर कोअर कमिटीशी चर्चा करून निर्णय घेऊ असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मात्र विधिमंडळ अधिवेशनात निलंबित झालेल्या आमदारांचे निलंबन मागे घेण्याबाबत कोणतीही राजकीय सौदेबाजी करणार नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

Advertisement
Advertisement

Leave a Reply