Take a fresh look at your lifestyle.

पोलिसांनी दाखवला इंगा….रेशन दुकानदारांना दणका….वाचा नेमकं कुठं घडलं प्रकरण….

पोलिसांनी सापळा रचून काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणाऱ्या धान्यावर छापा टाकत रेशनदुकानदारांना चांगलाच इंगा दाखवला. त्यामुळे रेशन दुकानदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 

अकोला : कोरोनाच्या काळात सर्वसामान्यांची अन्नाची गरज भागावी यासाठी मोफत धान्य देण्यास सुरूवात करण्यात आली. मात्र गोरगरीबांसाठी सरकारने दिलेल्या सार्वजनिक धान्य विरतण प्रणालीसाठी दिलेले धान्य काळ्या बाजारात येत होते. त्यामुळे पोलिसांनी सापळा रचून काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणाऱ्या धान्यावर छापा टाकत रेशनदुकानदारांना चांगलाच इंगा दाखवला. त्यामुळे रेशन दुकानदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Advertisement

अकोला जिल्ह्यातील खामगाव येथून हैद्राबाद येथील काळ्या बाजारात विक्रीसाठी रेशनचा गहू चालवला असल्याची बातमी विशेष पथकाला खबऱ्यामार्फत मिळाली. त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक त्यांच्या विशेष पथकाचे पोलिस निरीक्षक विलास पाटील यांच्या टीममधील कर्मचाऱ्यांनी बाळापुर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावरील साई ढाबा येथे नाकाबंदी करत खामगावच्या दिशेने जाणाऱ्या AP-20, TB 4699 या क्रमांकाच्या ट्रकला थांबवून झडती घेतली असता त्या ट्रकमध्ये शासकीय रेशनच्या गहू 30 टन म्हणजे 600 पोते गहू सापडला. त्यानंतर पोलिसांनी त्या ट्रकचालकाला हा गहू कोणाचा आहे? कुठे चालवला आहे याबाबत ट्रकचालकाला विचारणा केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांचा संशय आणखी बळावला.

Advertisement

त्यामुळे पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता गहू शासकीय रेशनचा असल्याचे समोर आले. तर हा गहू तेलंगणा राज्यात हैद्राबाद येथे विक्रीसाठी नेत असल्याचे ट्रकचालकाने सांगितले. त्यामुळे तेलंगणाच्या आदिलाबाद येथील 28 वर्षीय शेख जावेग ख्वाजा या ट्रकचालकाला अटक करण्यात आली. तसेच त्याच्याकडून 6 लाख रूपयांचा 30 टन गहू, 20 लाख रूपये किंमत असलेला ट्रक असा मिळून 26 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Advertisement

त्यानंतर बाळापुर पोलिस ठाण्यात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे भारतीय जीवनावश्यक अधिनियमाच्या कलम 3,7 अन्वये गुन्हा दाखल करून काळ्या बाजारात शासकीय रेशनचे धान्य विक्रीसाठी नेणाऱ्या रेशनचा मालक कोण? या चोरीच्या मागचा चेहरा कोण? याचा शोध पोलिस घेत आहेत. त्यामुळे काळ्याबाजारात विक्री करणाऱ्या रेशन दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत.

Advertisement
Advertisement

Leave a Reply