सेवानिवृत्त जवानांबद्दल भानुदास कोतकर म्हणाले असं काही…वाचा.
अहमदनगर तालुक्यातील इसळक येथील सेवानिवृत्त जवान सतिश शिवाजी गेरंगे यांनी सैन्यदलातील आपली 22 वर्षे सेवा पुर्ण केली. त्यांच्या सेवापुर्तीनिमीत्त ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्या स्वागत मिरवणूकीचे आयोजन केले होते.
अहमदनगर : सैन्यदलात सेवा देत असताना आपले जवान मोठा त्याग करत असतात. आपल्या कुटूंबापासून, गावापासून दुर राहून देशाचे रक्षण करत असतात. युध्द किंवा आपत्कालिन परिस्थितीत प्राणाचीही बाजी लावण्यास तयार असतात. त्यामुळे देशासाठी लढणाऱ्या प्रत्येक जवानाचा सन्मान करणे, त्याचा आदर करणे हे आपले कर्तव्यच आहे.
अहमदनगर तालुक्यातील इसळक येथील सेवानिवृत्त जवान सतिश शिवाजी गेरंगे यांनी सैन्यदलातील आपली 22 वर्षे सेवा पुर्ण केली. त्यांच्या सेवापुर्तीनिमीत्त ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्या स्वागत मिरवणूकीचे आयोजन केले होते. तर महिलांनी गेरंगे यांचे औक्षण करून स्वागत केले तर ग्रामस्थ मिरवणूकीत उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते.
यावेळी नगर-पारनेरचे आमदार निलेश लंके उशीराने कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यामुळे त्यांना गेरंगे यांच्या घरी जावे लागले. मात्र त्यामुळे विळदहून इसळक-निंबळक शिव रस्त्याची परिस्थिती लंकेंच्या लक्षात आली. त्यामुळे त्यांनी लगेचच रस्त्याच्या कामाचा आढावा घेत बैठकीचे आयोजन करून संबंधीतांना सुचना केल्या. तर त्यांनी सतिश गेरंगे यांना राष्ट्रवादीचे घड्याळ भेट देत शुभेच्छा दिल्या.
सत्कारप्रसंगी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक भानुदास कोतकर यांनी म्हटले की, जवान सतीश गेरंगे यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम नव्या पीढीसमोर आदर्श उभा करण्यासारखा आहे. तर हा पायंडा असाच पुढे सुरू रहायला हवा. जवान आपल्या कुटूंबापासून दुर सीमेवर देशाच्या रक्षणासाठी उभे असतात. त्यामुळे जवानांचा सन्मान करणे व त्यांना आदर देणे हे आपले कर्तव्यच आहे, असे मत व्यक्त केले.
तर सत्काराला उत्तर देतांना सतिश गेरंगे म्हणाले की, अनपेक्षितपणे हा सुखद धक्का मिळाला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये लष्करात सेवा केली आहे. मात्र, आजचा सन्मान आणि सत्काराचे हे भव्य रूप पाहून केलेला त्याग आणि सेवा सार्थकी लागली. हा सन्मान सोहळा पाहून भारावून गेलो असल्याचे सांगताना त्यांचा कंठ दाटून आला होता.
या क्रार्यक्रमप्रसंगी युवा नेते अजय लामखडे, इसळकचे सरपंच संजय गेरंगे, उपसरपंच बाळासाहेब कोतकर, सेवा संस्थेचे चेअरमन पोपट खामकर, भाऊसाहेब गायकवाड, उद्योजक पोपट तांबे, मच्छिंद्र म्हस्केे, अॅड. योगेश गेरंगे, संदीप कळसे, माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक वृंद आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
शेतकरी संघटनेचे नेते संदीप गेरंगे यांनी आभार मानले तर बाळासाहेब माधव कोतकर यांनी सुत्रसंचालन केले.