Take a fresh look at your lifestyle.

पारनेरप्रकरणी फडणवीसांचे CMO ला पत्र; तहसीलदार ऑडीओ क्लिपप्रकरणी भाजप आक्रमक

अहमदनगर : पारनेर तालुक्याच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिप तयार करून आत्महत्येचा इशारा देण्याच्या प्रकरणाने आता उचल खाल्ली आहे. कारण, आता याप्रकरणी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून लक्ष घालण्याची मागणी केली आहे. या क्लिपमुळे पारनेरसह राज्यात खळबळ उडाली. यापूर्वी वनाधिकारी दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येचा संदर्भ देत देवरे यांनी ऑडिओ क्लिप जारी केल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

Advertisement

भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकार आणि स्थानिक आमदार निलेश लंके यांच्यावर जोरदार हल्ला चढवलेला असतानाच आता फडणवीस यांनी म्हटलेय की, नगर जिल्ह्यातील पारनेर येथील तहसिलदार श्रीमती ज्योतीताई देवरे यांनी केलेले अतिशय गंभीर आरोप, आत्महत्येचा इशारा देणारी त्यांची ऑडिओ क्लिप, एकूणच प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने हस्तक्षेप करून त्यांना न्याय देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी यांना पत्र दिलेले आहे.

Advertisement

या पत्राची पत्र फडणवीस यांनी ट्विटरवर शेअर केली आहे. एकूणच यानिमित्ताने आता राज्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा वाद पेटण्याची शक्यता आहे. दरम्यान, आमदार निलेश लंके यांची याप्रकरणी आपली बाजू मांडणारी ऑडीओ क्लिप व्हायरल होत आहे. त्यातून लंके यांनी तहसीलदार देवरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असल्याकडे लक्ष वेधताना असे क्लिप व्हायरल करणे हा केविलवाणा प्रकार असल्याचे म्हटलेले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply