Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

वाव.. विखेंच्या विरोधात राष्ट्रवादीला मिळाला तगडा उमेदवार; लंकेंनी सांगितलाय दक्षिणेवर हक्क..!

अहमदनगर : जिल्ह्याच्या राजकारणासह राज्यभरात आपली छाप सोडण्याचा प्रयत्न विखे कुटुंबियांचा असतो. आताही आगामी जिल्हा परिषद निवडणुकीद्वारे पुन्हा एकदा जिल्ह्यावर ताबा घेण्यासह आगामी लोकसभा निवडणुकीत दक्षिण नगरची खासदारकी टिकवण्यासाठी विखे गट प्रयत्नशील आहे. अशावेळी आता भाजपच्या खासदार डॉ. सुजय विखे यांना आमदार निलेश लंके यांच्या रूपाने तगडा प्रतिस्पर्धी मिळाला आहे.

Advertisement

पारनेर तालुक्याच्या पळशी येथे बोलताना लंके यांनी पुन्हा एकदा प्रस्थापितांना इशारा देताना थेट भाजप नेते आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याच गटाला लक्ष्य केले आहे. नुकतीच खासदार डॉ. विखे यांनी टीका केल्याचा मुद्दा असल्याने आमदार लंके यांनी त्यास प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, कोणाच्याही टीकेकडे फारसे लक्ष देत नाही. मात्र, वेळ आली तर थेट लोकसभा निवडणूक लढण्यासाठीची तयारी असल्याचे त्यांनी सांगून टाकले आहे.

Advertisement

लंके यांनी टीका करताना म्हटले आहे की, अगोदर पारनेरमध्येच काहीजण मला विरोधक समजत होते. आता माझ्या कामामुळे जिल्ह्यातील काहीजण मला विरोधक समजतात. ते टीका करतात मात्र मी त्याकडे लक्ष देत नाही. माझ्याकडे संस्था, कारखाने किंवा हॉस्पिटल नाहीत. फ़क़्त जिवाभावाची माणसे आहेत. आता कोविड सेंटरच्या कामावर काहीजण टीका करतात. असे सांगताना विखे कुटुंबियांना आमदार लंके यांनी लक्ष्य केले आहे. त्यामुळे आता लोकसभेच्या निवडणुकीत डॉ. सुजय विखे विरुद्ध आमदार निलेश लंके असा सामना पाहण्याची नागरिकांनीही तयारी केली आहे.

Loading...
Advertisement

‘गुगल न्यूज’वर लाइव्ह न्यूज, लेख आणि मार्केट अपडेट वाचण्यासाठी https://bit.ly/3xX9aSV या लिंकवरून ‘कृषीरंग’ला फॉलो करा

Advertisement

Advertisement

Leave a Reply