Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

म्हणून पाकिस्तानच्या डोकेदुखीत झाली वाढ; खान सरकारच्या गृहमंत्र्यांनीच वाढवल्या अडचणी

दिल्ली : राजकारणी अनेकदा जास्त बोलून किंवा खरे बोलून स्वतःसह आपले नेते, पक्ष आणि देश यांनाही संकटात आणतात. भारतात जसे असे राजकारणी आहेत तसेच जगभरात असतात. आताही जाहीर कबुली देऊन पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांनी पंतप्रधान इम्रान खान यांची डोकेदुखी वाढवली आहे.

Advertisement

पाकिस्तानचे बोलघेवडे गृहराज्यमंत्री शेख रशीद यांनी अफगाण तालिबानी अतिरेक्यांची कुटुंबे राजधानी इस्लामाबादच्या प्रसिद्ध भागासह वेगवेगळ्या भागात राहतात असाच धक्कादायक खुलासा केला आहे. एवढेच नव्हे तर काही वेळा स्थानिक रुग्णालयातही त्यांच्यावर उपचार केले जातात असेही सांगून टाकले आहे. मंत्री राशिद यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा पाकिस्तान तालिबान्यांनी वेढला असल्याच्या मुद्द्यावर शिक्कामोर्तब झालेले आहे.

Advertisement

Advertisement

अफगाणिस्तानमधील बंडखोरीच्या कारवायांना प्रत्यक्ष व प्रगतीसाठी तालिबानी पाकिस्तानी मातीचा वापर करतात असा अफगाण नेत्यांनी केलेले आरोप पाकिस्तानने सातत्याने फेटाळले आहेत. पाकिस्तानच्या खासगी टीव्ही वाहिनी जिओ न्यूजवर रविवारी प्रसारित झालेल्या मुलाखतीत गृहमंत्री शेख रशीद म्हणाले की, “पाकिस्तानच्या रावत, लोही भेर, बहारा काहू आणि तारनोल भागात तालिबान्यांची कुटुंबे येथे राहतात.”

Loading...
Advertisement

मंत्र्यांनी नमूद केलेले भाग इस्लामाबादचे प्रसिद्ध उपनगरे आहेत. रशीद यांनी उर्दू भाषेत सांगितले की, “कधीकधी त्यांच्या (सैनिकांचे) मृतदेह रुग्णालयात आणले जातात तर काहीवेळा ते येथे उपचारासाठी येतात.” गेल्या दोन दशकांपासून अफगाण सरकारशी लढा देणाऱ्या अफगाण तालिबानी अतिरेक्यांना आश्रय देण्याचे व त्यांना पाठिंबा दिल्याचा पाकिस्तानवर अनेकदा आरोप आहे. पाकिस्तानच्या एका वरिष्ठ मंत्री आणि ज्येष्ठ राजकारण्यांनी ते मान्य करणे ही एक दुर्मिळ घटना आहे. परिणामी या देशाची डोकेदुखी वाढली आहे.

Advertisement

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply