Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अखेर वाद पेटलाच; नाराजीची किनार असल्याने वाढली राष्ट्रवादी व शिवसेनेची डोकेदुखी..!

Please wait..

अहमदनगर : शिर्डीच्या साई संस्थानाच्या विश्वस्त मंडळाची अधिकृतरीत्या नियुक्ती जाहीर होण्यापूर्वीच यातला राजकीय वाद पेटला आहे. संस्थानावर सरकराचा कचरा बसवण्यात आल्याची गंभीर टीका सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी केली आहे. तर, दारूनिर्मिती करणाऱ्यांचा संस्थानाला अड्डा बनवू नये अशी मानागी संभाजी ब्रिगेडने केली आहे. तर, लोकमत या अग्रगण्य दैनिकाने थेट ‘दारूनिर्मिती करणारे साई संस्थानाचे विश्वस्त कसे’, असाच प्रश्न केला आहे.

Advertisement

Advertisement

नगर जिल्ह्यातील लोकप्रिय नेते आणि दिग्गजांना डावलून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी युवा आमदार आशुतोष काळे यांना संधी दिली आहे. तसेच काँग्रेस आणि शिवसेना यांनीही आपापल्या मर्जीतला आणि नातेवाईक मंडळींचा भरणा या मंडळावर करून टाकला होता. परिणामी राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत खदखद होती. तीही आता बाहेर पडण्याची शक्यता आहे. साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी माजी आमदार अशोकराव काळे यांचे पुत्र, माजी खासदार शंकरराव काळे यांचे नातू, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नातेवाईक असलेल्या आशुतोष काळे यांची नियुक्ती अनेकांना खटकली आहे.

Advertisement
Loading...

यासह औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शिर्डी संस्थानच्या विश्वस्तपदाच्या नेमणुकीसंदर्भात राज्य सरकारच्या हालचाली सुरू झाल्यावर संस्थानवर विश्वस्त मंडळ नेमताना राज्यातील इतर देवस्थानला डोळ्यासमोर ठेऊन विश्वस्त मंडळ नेमावे, अशी मागणी शिर्डीतील सर्वपक्षीय नेत्यांनी केली होती. पंढरपूर, तुळजापूर, सिद्धीविनायक या राज्यातील प्रमुख देवस्थानाबाबत विश्वस्त मंडळ नेमताना स्थानिकांना प्राधान्य दिले जाते. त्याच धर्तीवर शिर्डीत नेमणुका जाहीर करण्याची मागणी केली होती. त्यालाही राज्य सरकारने वाटण्याच्या अक्षता दावल्या होत्या.

Advertisement

दरम्यान, संजय काळे आणि संभाजी ब्रिगेडचे टिळक भोस हे याप्रकरणी आक्रमक झालेले आहेत. राजकीय व्यक्ती टाळून सामाजिक, शैक्षणिक व इतर क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींना या विश्वस्त मंडळावर संधी देण्याची मागणी पुन्हा जोर धरून आहे. आता त्यावर राज्य सरकार कसा तोडगा काढते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

 

Advertisement
विश्वस्त मंडळावर यांची लागणार आहे वर्णी?
अध्यक्षपद : आमदार आशुतोष काळे (राष्ट्रवादी)
Advertisement

उपाध्यक्ष : माजी आमदार रवींद्र मिर्लेकर (शिवसेना)

राष्ट्रवादी काँग्रेस
Advertisement

आशुतोष काळे (अध्यक्ष)
जयंत जाधव
महेंद्र शेळके
सुरेश वाबळे
संदीप वर्पे
अनुराधा आदिक

काँग्रेस
Advertisement

डॉ एकनाथ गोंदकर
डी पी सावंत
सचिन गुजर
राजेंद्र भोतमागे
नामदेव गुंजाळ
संग्राम देशमुख

शिवसेना
Advertisement

रवींद्र मिर्लेकर (उपाध्यक्ष)
राहुल कनाल
खा. सदाशिव लोखंडे
रावसाहेब खेवरे

 

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.
Advertisement

Leave a Reply