Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

मराठा आरक्षण अपडेट : ‘त्या’ला बारा बलुतेदार महासंघाचा ठाम विरोध; पहा नेमके काय म्हटलेय त्यांनी

अहमदनगर : सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण नाकारल्यानंतर मराठा समाजाचा ओबीसीमध्ये (इतर मागासवर्गीय समाज) समावेश करून आरक्षण देण्याची मागणी आहे. असे झाले तर तमाम खऱ्या ओबीसी बांधवांचे आरक्षण अप्रत्यक्षपणे हिरावून घेतले जाईल. त्यामुळे होऊ नये म्हणून ओबीसी बांधवांनी संघटित होऊन याला विरोध करावा, असे आवाहन ओबीसी बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष व महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे राज्य उपाध्यक्ष माउली मामा गायकवाड यांनी केले आहे.

Advertisement

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्याला विरोध दर्शवून मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यास आमचा विरोध नसल्याचे त्यांनी स्पष्ट म्हटले आहे. कुठल्याही परिस्थितीत ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागत कामा नये. अन्यथा सुरक्षित अंतर ठेऊन सनदशीर मार्गाने आंदोलन करावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. या निवेदनावर गायकवाड यांच्यासह नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष इंजि. बाळासाहेब भुजबळ, राज्य मीडियाप्रमुख अजय रंधवे, बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल इवळे, शहराध्यक्ष शामराव औटी, जिल्हा कार्याध्यक्ष रमेश बिडवे, महिला शहर जिल्हाध्यक्ष अनुरिता झगडे, महिला जिल्हाध्यक्षा मनीषा गुरव, उपाध्यक्षा नवले, नाभिक महामंडळ महिला जिल्हाध्यक्षा वनिता बिडवे, जिल्हा उपाध्यक्षा सुलभा सटाणकर, ओबीसी बारा बलुतेदार युवा शाखेचे युवाध्यक्ष आर्यन गिरमे, यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांच्या सदस्यांच्या सह्या आहेत.

Loading...
Advertisement

ओबीसीमध्ये मराठा समाजाच्या समावेशाबाबत ठाम विरोध करण्याचा निर्णय महासंघाने घेतला असून याबाबत महासंघ आक्रमक भूमिका घेत आहे. गेल्या ८-१० दिवसात जिल्ह्यातील तमाम ओबीसी बारा बलुतेदारांशी ऑनलाईन संपर्क करून मुख्यमंत्र्यांना पत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला. यापुढे महासंघ संपूर्ण राज्यातील ओबीसी आणि बारा बलुतेदारांसह विविध संघटनांशी याबाबत संपर्क करणार आहे. महासंघाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे, ओबीसी-व्हीजेएनटी जनमोर्च्याचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप, मंत्री विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ आदी नेत्यांचे मार्गदर्शन यासाठी घेतले जाणार आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply