Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

आरोग्य योद्धा : ‘शेकडोंना मदत आणि समाधानाची झोप’ हीच आहे नितीन भांबळची स्टोरी..!

अहमदनगर : करोना योद्धा पुरस्कार मिळवण्यासाठी किंवा काहीतरी राजकीय लाभाच्या हेतून सध्या अनेकजण कोविडयोद्धे म्हणून मिरवत आहेत. त्यातील काहींचे काम चांगले आहेही. मात्र, त्याचवेळी अजिबात कुठेही मिरवण्याची इच्छा नसलेले अनेकजण सध्या सामान्य नागरिकांना आरोग्यदायी ठेवण्यासाठी धडपडत आहेत. त्यातलाच समाधानाची झोप मिळवण्यासाठी मदतीचा झरा बनलेला तरुण म्हणजे नितीन भांबळ.

Advertisement

अनेकांना हे नावही माहित नसेल. होय, बरोबरच आहे की. हा काही फ़क़्त चमकोगिरी करणारा पुढारी किंवा सेलिब्रिटी नाही. मात्र, मदत करून विसरून जाण्याचे व्यसन असलेला हा तरुण आहे अहमदनगर तालुक्यातील देहरे गावाचा. नगर-शिर्डी महामार्गावरील हे एक गाव. येथील मोठा नेता किंवा समाजसेवक नसलेला हा तरुण या करोनाच्या काळात अनेकांचा आधारवड ठरला आहे. न मिळणारी औषधे आणून दे, ऑक्सिजन सिलेंडरसाठी मदत किंवा रुग्णालयात बेड मिळत नसलेल्या रुग्णासाठी मदत करण्याचे वेड लागलेला हा तरुण जिल्हा रुग्णालयात हमखास भेटतो. कारण, गरिबांना सरकारी रुग्णालयात उपचार मिळवून देऊन समाधानाची झोप मिळवण्याचा त्याला छंद जडला आहे.

Advertisement

याबाबत नितीन सुरुवातीला बोलायला तयार नव्हता. आपले काम भले आणि त्यातून मिळणारे समाधान, अशीच त्याची धारणा. मात्र, अखेरीस कामासह त्याचे मूल्य जगापुढे आणण्याची भावनाही आवश्यक असल्याचे महत्व पटल्याने नितीनने आपले मन खुले केले. तो म्हणाला की, आमदार निलेश लंके हे आमचे नेते. त्यांनी भाळवणी येथे कोविड सेंटरमध्ये आरोग्य सेवाच वसा घेऊन काम सुरू केले आहे. आम्हीही मग आमच्या पातळीवर संभाजी राजे ग्रुप व जय मल्हार ग्रुपने आरोग्यसेवेसाठी काम सुरू केले आहे. करोना येण्याच्या अगोदर आम्हीही गावात व स्थानिक परिसरात काही कामे करीत होतो. मात्र, आता आमच्या कामाची व्याप्ती वाढली आहे. कारण, समाजाला त्याची गरज आहे. आणि आम्हाला त्यातच समाधान आहे.

Loading...
Advertisement

करोना कालावधीतील अनुभवाबद्दल नितीन सांगतो की, मुळात समाजसेवा म्हणजे आत्मिक समाधान. माझ्यासह गावोगावी अनेकजण याच भावनेने काम करीत असल्याने आपण करोना संकटाला थोपवू शकलो आहोत. या कालावधीत करोना प्रोटोकॉलचे पूर्णपणे पालन करून आपल्याला काम करायचे आहे. करोना संक्रमण वेगाने वाढत आहे. अशावेळी आपली इम्युनिटी पॉवर वाढवण्याकडे लक्ष द्या. लस घ्या आणि नियम पाळा. आता नियम पाळून आणि एकमेकांची काळजी घेऊनच आपण करोना संकटाला मूठमाती देऊ शकतो. तसेच फ़क़्त आपण आणि कुटुंब याच्याही पलीकडे जाऊन समाज म्हणून जगायला शिका. स्वच्छता आणि मदतीची भावना ठेवा.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply