Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘निनादीयन’ मंडळीनी केली अनेकांना मदत; पहा करोना कालावधीत काय केलेय संस्थेने

अहमदनगर : निनाद संस्थेतर्फे कोरोना काळात समाजातील गरजू व्यक्तींना उपयुक्त असे अनेक उपक्रम राबिवण्यात आले आहेत. तरुणांच्या एकीने आणि बहुमोल सहभागाने कोरोना पार्श्वभूमीवर ‘निनाद फाऊंडेशन’ चे समाजकार्य कौतुकास्पद ठरले आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाच म्हणजे गोर गरिबांसाठी उपयुक्त बनले आहे. त्यामुळे अनेकांनी ‘निनादीयन’ मंडळीचे कौतुक केले आहे.

Advertisement

‘आळंदी, पर्वती, हडपसर, दौंड, उदगीर’ या ठिकाणी हे उपक्रम पार पाडले जात आहेत. भाग्यश्री बोराटे, अनामिका किलजे, विशाल देशमुख, शीतल जाधव, भाग्यश्री देशमुख, सुयश यादव, सचिन खडके, अक्षदा कांबळे, वैभवी सोनवणे, प्रिया आढाव आदि या ठिकाणी नेतृत्व करत आहेत. “परिस्थिती कोणतीही असो,कितीही मोठे संकट आले तरी आम्ही नीनादीयन आपल्या माणसांची साथ सोडणार नाही” असे त्यांनी म्हटले आहे. संस्थेचे चालू असलेले कार्य :

Loading...
Advertisement
  • हातावर पोट असणाऱ्या व्यक्तींना दोन वेळेचा पौष्टिक आहार पुरविणे.
  • गरजू व्यक्तीने एका आठवड्याचे किंवा एका महिन्याचे किराणा साहित्य पुरविणे.
  • करोना बाधित रुग्णांच्या कुटुंबियांना फळभाज्या व पालेभाज्या देणे.
  • करोना विषाणू पासून संरक्षण करण्यासाठी मास्क व सॅनिटायझरचे वाटप करणे.

कोरोनाच्या काळात बेड उपलब्ध नसल्याने अनेक बळी जात आहेत. काहीठिकाणी अजून बेडची उपलब्धता असूनही पुरेपूर माहिती नसल्याने गरजू व्यक्तिना हे उपलब्ध होत नव्हते या परिस्थितीचा अंदाज निनाद फाऊंडेशनतर्फे घेण्यात आला व व्हेंटिलेटर बेड, ICU बेड, ऑक्सिजन बेड, isolation बेडची उपलब्धता करून देण्यात आली. दिनांक २८ एप्रिल ते २५ मे २०२१ पर्यंत १३,०५९ बेडची खात्रीशीर उपलब्धता निनादीयन यांनी केली आहे. गरजूंपर्यंत पोहचवून अनेक जीव वाचवले आहेत आणि हे काम असेच चालू राहणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply